मुंबई

ठाणे जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम

CD

ठाणे जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम
पाच ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे होणार लसीकरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत गोवर व रुबेला आजारांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत पाच ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर-रुबेला लस दिली जाणार आहे.
गोवर हा विषाणूमुळे होणारा साथीचा आजार आहे. रुबेलामुळे गर्भवती स्त्रियांमध्ये व नवजात बालकांमध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात. या आजारांवर विशिष्ट उपचार उपलब्ध नसले तरी एमआर लसीकरण हे सर्वात प्रभावी संरक्षण आहे. जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त साध्य करणे, एमआर लसीच्या दोन डोसमधील ड्रोप आऊट रेट शून्यापर्यंत आणणे हे प्रमुख उद्दिष्टे आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

लसीकरण
३९ आश्रमशाळांतील १४ हजार १२३ बालकांचे एमआर लसीकरण चुकले असल्यास किंवा तारखा माहीत नसल्यास त्या बालकांना एक डोस देण्यात येईल.
प्रत्येक आश्रमशाळा/मदरशामध्ये लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. एका चमूद्वारे दिवसाला १५० बालकांचे लसीकरण केले जाईल.
प्रत्येक चमूमध्ये सहा सदस्य असतील.
केवळ प्रशिक्षित कर्मचारीच लसीकरण करतील.

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

Manchar News : स्मार्ट मीटरमुळे गरीब शेतमजुरांवर लाखोंचे वीजबिल, आंबेगावात कुटुंब अंधारात

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT