मुंबई

पदपथावर नर्सरीचे अतिक्रमण; पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

CD

पदपथावर नर्सरीचे अतिक्रमण; पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
पालिकेच्या दुर्लक्षेमुळे नागरिकांत संताप, अपघाताची शक्यता वाढली
नेरूळ, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबईतील पामबीच मार्गावरून नेरूळकडे प्रवेश करताना सेक्टर ४ च्या डाव्या बाजूला असलेला पदपथ पादचाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या पदपथावर अवैध नर्सरीने कब्जा केला. त्‍यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नियोजित शहर म्‍हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. मात्र बेकायदा पार्किंग, पदपथावर अतिक्रमण याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही वर्षापासून नवी मुंबईतील मोकळ्या जागेत तसेच पदपथावर नर्सरीचे प्रमाणदेखील लक्षणिय वाढले आहे. नवी मुंबईतील पामबीच मार्गावरून नेरूळकडे प्रवेश करताना सेक्टर ४ च्या डाव्या बाजूला असलेल्या पदपथवर नर्सरी थाटण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाकडून शहरात कुठेही झोपडी उभारली तरी तत्काळ कारवाई करण्यात येते, मात्र संपूर्ण पदपथ अतिक्रमित करून उभारलेल्या या नर्सरीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्‍यक्‍त केले जात आहे. या ठिकाणी मागील दोन महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेने कारवाई केली होती. त्या वेळी नर्सरी हटवण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा या ठिकाणी नर्सरी उभी राहिली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अतिक्रमणाविरोधातली कारवाई फक्त दिखावा तर नाही ना, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''एक व्यक्ती आपल्यात नाही, याची उणीव भासतेय..'' भरसभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण?

Kolhapur Election : नेत्यांची विरोधकांशी घसट, कार्यकर्त्यांची फरपट; पाच नगरपालिकांत भाजपचे ‘कमळ’ गायब, मुख्यमंत्र्यांवर कार्यकर्ते नाराज

फक्त तू आणि मी कुठेतरी जायचं का? ज्वेलर्सच्या उद्धघाटनाला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला मालकाचा थेट प्रश्न; म्हणाली, 'दुसऱ्या अभिनेत्रींमुळे आम्हालाही...'

धर्मेंद्र यांचा अखेरचा आवाज…! इकडे 'इक्कीस' सिनेमातील धर्मेंद्र यांची वॉईस नोट व्हायरल, दुसरीकडे पंचतत्वात विलीन झाले ही मॅन

Karnataka Politics : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण! DK शिवकुमारांनी दिला थेट इशारा; म्हणाले, 'घर फोडण्याचं काम..'

SCROLL FOR NEXT