मुंबई

प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पूर्ण

CD

सिमांकनात बदल झाल्याने विरोध
प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील तीन दिवसांपासून ही सुनावणी सुरू होती. तिसऱ्या व अखेरच्या दिवशी २८ हरकती आणि सूचनांवर सुनावणी पार पडली. काही प्रभागांच्या सिमांकनात बदल झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. या हरकतींवर तीन दिवस मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, या ठिकाणी तीन दिवस सुनावणी घेण्यात आली. सुनावणीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी म्हणून राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंह चहल यांची उपस्थिती होती. शुक्रवारी (ता.१२) झालेल्या सुनावणीला पालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित केले आहेत. या अंतर्गत २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी केली होती. त्यावर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या प्रारूप रचनेसंदर्भात प्राप्त सूचना व हरकतींवर १० ते १२ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र या ठिकाणी सुनावणी झाली. हरकतदार नागरिकांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून आपल्या हरकती आणि सूचना शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

सुनावणीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी (ता. १०) १८९ सूचना आणि हरकती, गुरूवारी (ता. ११) २७७ हरकती आणि सूचना तसेच शुक्रवारी (ता.१२) २८ सूचना व हरकतींवर सुनावणी झाली. तीन दिवसांच्या सुनावणी कार्यक्रमात मिळून एकूण ४९४ हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

कुर्ला, वांद्रे विभागात सर्वाधिक आक्षेप
मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या प्रभाग रचनेवरील सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी तब्बल २७७ सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये कुर्ला पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १६९ मधून सर्वाधिक हरकती नोंदवल्या. स्थानिक माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी या प्रभागातील बदलांविरोधात तीव्र आक्षेप नोंदवले. त्यांनी सांगितले की, सुमारे तीन हजार मतदारांचा परिसर असलेल्या सहा इमारतींचा भाग प्रभाग क्र. १७० मध्ये दाखवला आहे, तर मतदान केंद्रे मात्र नेहरू नगरऐवजी चुनाभट्टी येथे दाखवली आहेत. यामुळे नागरिकांना गैरसोय होणार असल्याचा त्यांनी सवाल उपस्थित केला. तर वांद्रे खेरवाडी (खटीक) येथील वॉर्ड नंबर ९५, ९६, १०० या वॉर्डातून सर्वाधिक हरकती मांडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT