‘बविआ’च्या माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश
विरार, ता. १२ (बातमीदार) : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ११) ‘बविआ’च्या माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक मोहम्मद खाटीक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेना नेते रवींद्र फाटक यांनी वसई पूर्व भागात शिवसेना आणखी जोमाने वाढवण्यासाठी मोहम्मद खाटीक यांना बळ दिले जाईल, तसेच त्यांच्यावर लवकरच संघटनात्मक मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचेही सांगितले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नीलेश तेंडोलकर, पालघर जिल्हा सचिव अतुल पाटील, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंह, धनंजय मोहिते, अनिल चव्हाण, उपतालुकाप्रमुख खुर्शिद खान आदी उपस्थित होते.