मुंबई

ठाकरे गटाकडून रविवारी जोरदार आंदोलन

CD

ठाण्यात ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शने
ठाणे, ता. १४ : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ ठाण्यात ठाकरे गटाने रविवारी जोरदार आंदोलन केले. ‘शहीदों के सन्मान में, देशभक्त उतरे मैदान में’, ‘क्रिकेट नाही, युद्ध खेळू’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी घराघरातून सिंदूर जमा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवत सरकारला शहिदांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यावरून विरोधकांनी टीका केली असून, शिवसेना ठाकरे गटाने ‘माझं कुंकू, माझा देश’ हे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याअंतर्गत ठाण्यातही शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वामध्ये चंदनवाडी शाखा येथे हे आंदोलन झाले. देशभरात पाकिस्तानविरुद्ध तीव्र जनभावना असताना केंद्र सरकारने क्रिकेट सामन्यास परवानगी देऊन शहिदांचा अपमान केला असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ अशी घोषणा केली होती. मात्र आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यास परवानगी देऊन सरकारने स्वतःच्याच घोषणेला हरताळ फासल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या वेळी संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे, जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटका आकाश राणे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, विद्या कदम, स्मिता इंदुलकर, अनिता प्रभू, पुष्पालता भानुशाली, योगिता नाईक यांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT