उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेवाळी परिसरात राहणारे आफताब कुरेशी आणि सुफियान अबू बकर या दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बेड्या ठोकल्या असून, या अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. वडिलांचा व्यवसाय, घरातील तणाव, मोबाईलवरील अतिरेकी व्हिडिओ आणि चुकीच्या संगतीमुळे आफताब दहशतवादी मार्गावर कसा गेला याचे चित्र आता स्पष्ट होत आहे.
आफताब कुरेशी आणि सुफियान अबू बकर या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. उल्हासनगर पोलिसांनीही चौकशीला गती दिली आहे. आफताब आपल्या कुटुंबासोबत नेवाळीत राहत होता. त्याच्या वडिलांचा मटण विक्रीचा व्यवसाय असून कुटुंब साध्या परिस्थितीत जगत होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आफताब नेहमी मोबाईलवर अतिरेकी संघटनांचे व्हिडिओ पाहत असे आणि हळूहळू तो त्यांच्या संपर्कात आला. या चुकीच्या मार्गामुळेच तो सुफियान अबू बकरच्या सहवासात गेला. आफताबचे वडील यांनी या घटनेबद्दल भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘आफताब जाताना माझे आठ हजार रुपये घेऊन गेला. मी त्याला रोखण्यासाठी ओरडलोही, व्यवसायात लक्ष दे. त्या मुलासोबत जाऊ नकोस असे बजावले. पण त्याने घरातून निघून जाण्याचा हट्ट धरला’. त्यांनी पुढे सांगितले, ‘दिल्ली पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली; पण त्यांना काहीही संशयास्पद सापडले नाही. आफताब या मार्गावर कसा गेला याची मला कल्पनाही नाही’.
दहा वर्षांपूर्वीही अशीच घटना
या प्रकरणामुळे उल्हासनगर परिसरात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे. अगदी १० वर्षांपूर्वी म्हणजेच १० सप्टेंबर २०१४ मध्ये कल्याणमधील चार तरुण आयसिसमध्ये सामील झाले होते. त्याच दिवशी पुन्हा १० सप्टेंबरला नेवाळी परिसरातील हे दोन तरुण दिल्ली पोलिसांच्या तावडीत सापडले. या धक्कादायक साम्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, नेवाळीत राहणाऱ्या या तरुणांचा दहशतवादी संघटनांशी नेमका कसा संबंध प्रस्थापित झाला, त्यामागे कोण आहे, त्यांचे इतर साथीदार कुठे आहेत याचा मागोवा घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.