बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन
विरार, ता.१५ (बातमीदार) : वसईचे भूषण असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर( ८६) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे. नरेश उसनकर हे श्रीधर पारकर सरांचे शिष्य होते. त्यांना उदय शंकर, पार्वतीकुमार, सचिन शंकर यांच मार्गदर्शन लाभले दशावतार, सिताहरण, संत रविदास, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, अशा अनेक कलाकृती नृत्यातून साकारल्या नृत्याचार्य उदय शंकर यांच्या शैलीचा अवलंब करून त्यांनी स्वतःची नृत्य शैली तयीर केली होती. १९६८ - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती वि.वी गिरी, मार्शल टिटो यांचे हस्ते दिल्लीत सुवर्ण पदकाने सन्मानीत केले होते. त्यांचे संपुर्ण कुटुंब नृत्यकलेत काम करत आहेत. शंकर भगवान मंदिर - अध्यात्मिक, नृत्य कलेचे ७५ वर्ष उपासक होते. ते चर्मकार समाजाच भुषण असलेले अंतराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत होते.त्यांच्या निधना बद्दल माजी महापौर नारायण मानकर,संत रोहिदास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव, कला क्रीडा विकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश वनमाळी यांनी शोक व्यक्त केला आहे. उसनकर यांच्यावर आज संद्याकाळी बोरिवली येथील स्मशान भूमीत इलेक्ट्रिक शेगडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.