प्रभागरचनेवरून राजकीय शिमगा
अनुसूचित जातींचे अस्तित्व संपवण्याचा आरोप
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई पालिकेच्या नव्या प्रभागरचनेत अनुसूचित जमातींचे अस्तित्व संपवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे निवडणुका लागण्यापूर्वीच नवीन प्रभागरचनेवरून राजकीय शिमगा रंगला आहे.
जुईनगर परिसरात २०१५ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले होते. या परिसरात प्रभाग क्रमांक ८३ व ८४ दोन एससी समाजाचे नगरसेवक होते, परंतु नवीन प्रभागरचनेत संपूर्ण अनुसूचित जातीचा समाज विखुरल्याने आरक्षण पडणे अशक्य आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह अनुसूचित जातीतील इतर पक्षातील प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आहे. अशा प्रभागरचनेमुळे अनुसूचित जातीचे लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व कमी होणार असून, अनेक ठिकाणी आरक्षणाचा थेट फटका बसणार आहे. परिणामी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुसूचित जातीचा आवाज दडपला जाऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. तेसच पालिका सभागृहापासून अनुसूचित जातीला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचे बोलेल जात आहे. त्यामुळे घटनात्मक हक्कांसाठी माजी नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढाई उभारण्याचा निर्धार केला आहे.
-------------------------------
नोंदवलेले आक्षेप
- महापालिकेत एकूण १० अनुसूचित जाती आणि दोन अनुसूचित जमातीचे प्रभाग आरक्षित होते. १४ गावांना नवी मुंबईत घेऊनही नगरसेवकांची १११ संख्या ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी भौगोलिक संलग्नता नसताना त्या १४ गावांचा प्रभाग जोडण्यात आला आहे.
- आरक्षण पुढे बदल्याचे बोलले जात आहे. प्रभागरचना सुरू करताना झालेली चूक शेवटपर्यंत आहे. ३९ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग बनवला आहे, तर एक ४५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येचा बनल्याने प्रभाग चुकीच्या पद्धतीने बनल्याचा दावा होत आहे.
--------------------------
आरक्षणासाठी १४ गावे समाविष्ट करताना गैरफायदा घेत सुरुवात करण्यात आली. ऐरोलीचे विभाजन केले. त्यामुळे थेट आरक्षणावर घाला घातल्याचे हरकतीच्या दिवशीच सांगितले. प्रभागाचे विभाजन ४० हजार लोकसंख्येने केले असते, तर प्रभाग तुटलेच नसते.
- सुधाकर सोनावणे, माजी महापौर, नवी मुंबई महापालिका
--------------------------
अनुसूचित जातीसाठी १० प्रभाग राखीव होते. वाढीव लोकसंख्यमुळे अनुसूचित जातीचे प्रभाग वाढू नयेत, म्हणून प्रशासनचा हा डाव आहे. याबाबत स्थानिक सदन पुढाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पालिकेत मागास वर्गातील लोक निवडून येत नाहीत. अधिकाऱ्यांवर दबावा आणून, अशी प्रभागरचना करण्यात येते.
- महेश खरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रिपाइं (आठवले गट)
------------------------------------
आमचा प्रभाग क्रमांक १८ ला जोडला गेल्याने अनुसूचित समाजाचे अस्तित्व संपणार आहे. जुईनगरच्या नागरिकांना वाशीला जाताना त्रास होईल, शिवाय नेरूळ प्रभागाशी संपर्क तुटेल. नागरिकांची कामे होणार नाहीत.
-तनुजा मढवी, माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक ८३, जुईनगर
--------------------------------------
आरक्षण पडू नये म्हणून सत्ताधाऱ्यांचा हा डाव आहे. शिंदे गटाचे उमेदवार निवडून यावेत, म्हणून हा प्रभाग त्यांच्यासाठी सोयीचा केला आहे. या प्रभागात अनुसूचित जातीचे मतदान अधिक आहे. चुकीच्या पद्धतीने आरक्षण करून समाजाला विभागले आहे.
-विशाल ससाणे, माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक ८४, जुईनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.