मुंबई

हळवे भातपीक बहरले

CD

हळवे भातपीक बहरले
परिस्थिती समाधानकारक राहिल्यास एका महिन्यात कापणीस तयार
वाणगाव, ता. १५ (बातमीदार) : मागील काही दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे भातशेतीवर करपा, कडा करपा, बगळ्या रोग आणि काही प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव जाणवत होता. सध्या पालघर जिल्ह्यात गारवा, पाऊस सरींच्या स्वरूपात बरसत असल्याने भात खाचरात आवश्यक तितकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यातील भातपिकाला चांगले फुटवे आले आहेत. जिल्ह्यातील हळवी भातपिके फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.
जिल्ह्यातील गरवे आणि निमगरवे भातशेती पोटरीत आली असून, लोंब्या तयार होताना दिसत आहेत. गेल्या हंगामापेक्षा यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात भातलागवड झाली आहे. भातपीक चांगलेच बहरत आहे. त्यामुळे समाधानकारक परिस्थिती राहिल्यास पुढील एका महिन्यात भात कापणीस तयार होईल, असे डहाणू कृषी विभागामार्फत सांगण्यात आले. पुढील काळात पावसाने उघडीप देणे भातशेतीच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे, असे डहाणूचे प्रगतिशील शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले. शेतकरी आधुनिक विचारसरणीचा असल्याने आणि अनेक वर्षांपासून भातशेती करीत असल्याने भातपिकाचे बारकावे याची पूर्णपणे जाणीव आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुरशीजन्य रोग तसेच अळ्या, किडी यांच्या बाबतीत सतर्क राहावे. बदलत्या निसर्गाच्या लहरींचा अंदाज घेऊन भातशेतीचे नियोजन करावे.

चौकट
भात खाचरात खतांचे नियोजन :
भात शेतीसाठी हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश अशी खतांची शिफारस करण्यात आलेली आहे. भाताच्या रोपांची लावणी करून साधारणतः ५५ ते ६० दिवस झाले आहेत. जिल्ह्यात हळव्या जाती, गरव्या आणि निमगरव्या तसेच संकरित वाणांची लागवड करण्यात आली आहे. भातशेतीच्या शेवटच्या टप्प्यात निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लावणीनंतर २० टक्के नत्र आणि संकरित जातींकरिता उर्वरित २५ टक्के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

कोट
हळवे भातपीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी पाच ते दहा सेमीपर्यंत ठेवावी. बांध तनमुक्त ठेवावे, जेणेकरून किडीची खाद्य वनस्पती नष्ट होऊन भातपिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
- डॉ. भरत कुशारे, ॲग्रोनॉमिस्ट, शास्त्रज्ञ

कोट
मागील काही दिवसांत मुसळधार पावसाने भातशेतीला अक्षरशः झोडपून काढले. ढगाळ वातावरणामुळे भातपिकावर रोगराईची लागण होण्याची शक्यता होती. सद्य:स्थितीत समाधानकारक पाऊस पडत असल्याने भात खाचरात आवश्यक तितका पाणीसाठा आहे. दरम्यान, पुढील काळात पावसाने उघडीप देणे आवश्यक आहे. सध्या हळवे भात चांगलेच तयार होत आहे. हळवे भातपीक सध्या पोटरीत आले असून, दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. दाणे भरण्याच्या कालावधीत पावसाने साथ दिल्यास यंदा चांगले उत्पादन येऊ शकते.
- संजय पाटील, भात उत्पादक शेतकरी, उर्से, डहाणू
Asso ciated Media Ids : MUM25F07202, MUM25F07203, MUM25F07204

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : येवल्यात तासाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT