कालच्या सामन्यावर आम्ही थुंकलो
खासदार संजय राऊत यांनी उद्विग्न भावना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पाकिस्तान हरला किंवा जिंकला, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही कालच्या सामन्यावर थुंकलो. २६ महिलांचे कुंकू पुसल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत आहात, तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे उद्विग्न वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
आशिया कप २०२५च्या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना काल पार पडला. या सामन्यावर अनेक लोकांनी बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली. दरम्यान, सामन्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. एक्स माध्यमावर त्यांनी केलेल्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.
खासदार राऊत म्हणाले, की पाकिस्तानला जागतिक बँक, आयआयएम, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करीत होतो. हा पैसा दहशतवादासाठी गुंतवतील, अशी मोदींची भूमिका आहे. आता त्याच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला काल एक हजार कोटी रुपये तुम्ही दिले. शिवाय दीड लाख कोटींचा सट्टाही खेळला गेला. यातील काही हजारो कोटी पाकिस्तानकडे गेले, म्हणजे पाकिस्तानला आपण महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम केले आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘भारतीय संघाने हस्तांदोलन केले नाही हे सगळे ढोंग आणि नाटक आहे. हे सगळे मोदी यांनी आधीच ठरवलेले असते. हस्तांदाेलन केले नाही हे कशाला सांगतायेत. तुम्ही खेळलात ना मैदानावर. पैशांसाठी खेळाडू एका मॅचवर बहिष्कार टाकू शकत नाहीत का, किती लोक राष्ट्रावादासाठी फासावर गेले,’ असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
----
‘त्यांनी आलेपाकही खाऊ नये’
भारत-पाकिस्तान कोणताही सामना होणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण खेळलाे पाहिजे आणि त्या दृष्टीने हा सामना झाला आहे. आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिले तसे आपल्या क्रिकेट खेळाडूंनीही चोख उत्तर दिले आहे. हा विजय खेळाडूंनी लढवय्या सैनिकांसाठी समर्पित केला आहे. पाक या शब्दाचा एवढा राग असेल तर त्यांनी आलेपाकही खाऊ नये, अशी प्रतिक्रिया मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.