इच्छुकांचे तळ्यात-मळ्यात
नवी मुंबईत महायुतीमधील धुसफुसीने संभ्रम
वाशी, ता. १६ (बातमीदार)ः केंद्रात, राज्यात महायुती असली तरी नवी मुंबईत स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये धुसफुस सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांच्यात निवडणुकीपूर्वीच वाद सुरू आहे. युती झाल्यास एकीकडे इच्छुकांची संधी जाणार आहे, तर दुसरीकडे उमेदवार नसल्याने मविआकडून संधी मिळण्याच्या शक्यतेने इच्छुक तळ्यात-मळ्यात आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका एप्रिल २०२० मध्ये होणार होत्या. कोरोनामुळे निवडणुका जवळपास साडेपाच वर्षे लांबणीवर गेल्या आहेत, पण इच्छुक उमेदवार साडेपाच वर्षांपासून प्रभागांमध्ये कार्यरत आहेत. अशातच राज्यात झालेल्या सत्तांतरांनतर विविध घडमोडी सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना दुभंगल्याने नवी मुंबईतदेखील त्याचे पडसाद उमटले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये वाढ झाली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर अनेक इच्छुकांनी महाविकास आघाडीची साथ सोडत शिवसेना शिंदे गट, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक संधीच्या प्रतीक्षेत आहेत.
---------------------------------------------
महायुती, मविआचा पर्याय
- प्रभाग आरक्षणावर महायुती, महाविकास आघाडीच्या उमदेवारांनी हरकती घेतल्या आहेत. महायुतीमध्ये यावरून खडाजंगी सुरू आहे. शिंदे सेना, भाजप एकमेकांवर आरोप करत आहे. प्रभाग फुटल्यामुळे इच्छुक ज्या पक्षाबरोबर आहे, त्याच पक्षाबरोबर असल्याचे दाखवत आहे, पण पॅनेलमध्ये कशा पद्धतीने निभाव लागले, यासाठी प्रयत्न करत आहे.
- नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाली आहे. त्यावरील हरकती, सुनावणी संपली असून, आता अंतिम प्रभागरचना, आरक्षण सोडतीकडे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे, पण इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळाले नाही, तर दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.