मुंबई

क्षेत्रस्तरिय निरंकारी महिला संत समागम हर्षोल्हासात

CD

निरंकारी महिला संत समागम हर्षोल्हासात
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांचे सक्षमीकरण व आत्मिक उन्नतीच्या हेतूने संत निरंकारी मिशनतर्फे शहाड आणि ठाणे येथे क्षेत्रस्तरीय निरंकारी महिला संत समागम सोहळा पार पडला. याव्यतिरिक्त मुंबई महानगर परिक्षेत्रात चेंबूर, वाशी आणि भाईंदर याही ठिकाणी अशाच महिला संत समागम घेण्यात आले.

संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली झोनअंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, शहाड येथे रविवारी क्षेत्रस्तरीय निरंकारी महिला संत समागम घेण्यात आला. या संत समागमामध्ये डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, वाशिंद, शहापूर, कसारा, भिवंडी, मुरबाड अशा ठिकाणांहून हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. या महिला संत समागमामध्ये महिला वक्त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, बंजारा, भोजपुरी, सिंधी आदी भाषांमध्ये गीत, विचार, कविता सादर करून संत निरंकारी मिशनचा संदेश दिला.
संत समागमामध्ये पुणे येथून विशेष रूपाने आलेल्या निरंकारी प्रचारिका बिना अडवाणी यांनी मुख्य मंचावरून सांगितले, की आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आज सतगुरू माताजींच्या कृपेने आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपल्याला सत्य-असत्य, योग्य-अयोग्य याची जाण आली आहे. या ज्ञानामुळे आपल्याला एकरस अवस्था प्राप्त होते. त्यासाठी सातत्याने ज्ञानानुसार आपले आचरण व्हायला हवे.

महिलेची आई, बहीण, मुलगी, सून अशी अनेक सुंदर रूपे आहेत. प्रत्येक भूमिकेत आपण आपली कर्तव्ये निष्ठेने आणि प्रेमाने पार पाडली पाहिजेत. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांची कृपा आणि जगतमाता बुधवंतीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी यांचं तपत्यागपूर्ण आदर्श जीवन यामधून प्रेरणा घेऊन आपणही आपले जीवन उज्ज्वल बनवायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

आंतरिक सुंदरता महत्त्वाची
वागळे इस्टेट, ठाणे येथील सत्संग भवनमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या महिला संत समागमात ठाणे शहर, कळवा व मुंब्रा, दिवा आदी परिसरातून सुमारे १,५०० महिलांनी उत्साहाने भाग घेतला. या महिला संत समागमामध्ये अहमदाबाद येथून विशेष रूपाने आलेल्या सीमा रामचंदानी यांनी मुख्य मंचावरून म्हटले, की महिलांनी केवळ आपल्या शरीराच्या सजावटीकडे लक्ष न देता अंत:करण सुंदर, पावन व पवित्र बनविण्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. बाह्य सुंदरतेसाठी विविध प्रसाधनांचा उपयोग केला जातो; परंतु आंतरिक सुंदरता आत्मिक प्रेमात व भक्तीमध्ये साठली आहे. सत्य, भक्ती व प्रेम जेव्हा आपल्या हृदयात नांदू लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने याला व्यावहारिक अध्यात्म असे म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT