मुंबई

घटस्थापनेसाठी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुहूर्त

CD

मुरबाड, ता. २१ (वार्ताहर) : ग्रामीण व शहरी भागात, तसेच आदिवासी पट्ट्यात गणेशोत्सवानंतर एक आठवडाभरात ग्रामीण व शहरी भागात साजरा होणारा महत्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. देवीच्या नऊ रुपांची आराधना आणि उपासना करण्याचा हा काळ भक्तांसाठी अत्यंत मंगलमय मानला जातो. शारदीय नवरात्र सोमवार (ता. २२)पासून सुरू होत आहे. या दिवशी घटस्थापना होणार असून, यामध्ये विशिष्ट शुभ मुहूर्तावर देवीची स्थापना आणि पूजन करावी. घटस्थापनेसाठी मंगळवारी (ता. २३) दुपारी तीन वाजेपर्यंत मुहूर्त आहे. ग्रामीण भागात घटस्थापनेला पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करून घट बसविले जातात. अर्थात घटस्थापना केली जाते. ही परंपरा आजही कायम असल्याचे दिसून येत आहे.

घटस्थापनेचा मुहूर्त
शुभ मुहूर्त सुरू : २२ सप्टेंबर पहाटे ०१:२३ वाजता
शुभ मुहूर्त समाप्त : २३ सप्टेंबर दुपारी २:५५ वाजता

घटस्थापनेपूर्वीचा पूजा विधी :
पूजा करण्यापूर्वी घर आणि मंदिर स्वच्छ करा. गंगाजल शिंपडून जागा शुद्ध करा. ईशान्य किंवा उत्तर दिशेला एक स्वच्छ कपडा अंथरून देवीची मूर्ती, प्रतिमा स्थापन करावी.

घटाची स्थापना करण्याची पद्धत:
- मातीच्या भांड्यात ज्वारी किंवा बार्लीचे धान्य पेरा.
- तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी, गंगाजल, सुपारी, नाणे, अक्षता ठेवा.
- कलशावर नारळ ठेवून लाल चुनरी बांधा.
- कुंकवाने स्वस्तिक बनवा आणि धागा बांधा.

देवीची पूजा आणि आराधना कशी करावी?
देवीला फळे, मिठाई, सुपारी, अक्षता अर्पण करावी. दुर्गा सप्तशती किंवा नवरात्र स्तोत्रचे पठण करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटावा.

शारदीय नवरात्रोत्सवातील रंग
दिवस तारीख वार देवीचे रूप शुभ रंग
१ २२ सप्टेंबर सोमवार शैलपुत्री पांढरा
२ २३ सप्टेंबर मंगळवार ब्रह्मचारिणी लाल
३ २४ सप्टेंबर बुधवार चंद्रघंटा निळा
४ २५ सप्टेंबर गुरुवार कुष्मांडा पिवळा
५ २६ सप्टेंबर शुक्रवार स्कंदमाता हिरवा
६ २७ सप्टेंबर शनिवार कात्यायनी राखाडी
७ २८ सप्टेंबर रविवार जगदंबा तांबडा
८ २९ सप्टेंबर सोमवार महागौरी जांभळा
९ ३० सप्टेंबर मंगळवार सिद्धीदात्री गुलाबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : दौंड–इंदापूरमध्ये बनावट मद्याचा भंडाफोड; तीन लाखांचा साठा जप्त; तीन तरुणांना अटक!

Latest Marathi News Update LIVE : ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा

Sangli News: नाराजांसह बंडाची तयारी करणाऱ्यांची मनधरणी सुरु; ‘पॅचअप’साठी बैठकांचे सत्र; अनेक नाराजांकडून पक्षांतराची घोषणा

Balapur Crime : तुरीच्या शेतात धक्कादायक घटना: जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडताच परिसरात खळबळ!

Ichalkaranji News: इच्छुकांची धाकधूक वाढली; महापालिका निवडणुकीची अनिश्‍चितता, हालचालींना ब्रेक

SCROLL FOR NEXT