मुंबई

अभियंते ही विकासयात्रेतील प्रमुख ताकद

CD

अभियंते ही विकासयात्रेतील प्रमुख ताकद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे प्रतिपादन
ठाणे, ता. १६ : अभियंत्यांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. अभ्यासपूर्वक व तांत्रिक कौशल्य आत्मसात करून कामकाज करणे हीच खरी प्रगती आहे. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारल्यास ग्रामविकास, लोककल्याणाचे उद्दिष्ट साध्य होईल. जिल्हा परिषदेतील अभियंते ही विकासयात्रेतील प्रमुख ताकद असून, त्यांचे योगदान असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त ‘अभियंता दिन’ व ‘आदर्श अभियंता पुरस्कार वितरण समारंभ’ जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १५) समिती सभागृह, बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका, ठाणे (प.) येथे पार पडला. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार या वेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, की जिल्हा परिषदेतील अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. कामकाज अधिक सुलभ व परिणामकारक होण्यासाठी समन्वय, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरतो. या माध्यमातून समाजहिताचे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवता येतील. कार्यकारी अभियंता, बांधकाम इंजि. पद्माकर लहाने यांनी उपस्थित सर्व अभियंत्यांना विकासकामे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यात अग्रेसर राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, या कार्यक्रमात सेवानिवृत्त अभियंते विलास चौधरी, संतोष विशे, काशिनाथ भोईर, अनिल वाणी, विजय खानविलकर, प्रकाश सांबरे, तुकाराम जंगम, किशोर कुंभारे, युवराज निपुर्ते व शेख मोहम्मद शरिफ यांचा यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट :
आदर्श अभियंता पुरस्कार प्राप्त अभियंते
अनिल जीवनराव दिवाण, शाखा अभियंता, जि. प. बांधकाम उपविभाग, शहापूर-आदिवासी भागात उल्लेखनीय सेवा
मनीषकुमार बागलराव हेर्लेकर, कनिष्ठ अभियंता, जि. प. बांधकाम उपविभाग, कल्याण-प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागात विशेष कार्य
कैलास पंडितराव खलाणे, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ठाणे-पाणीटंचाई निवारण कामात कौशल्यपूर्ण योगदान
विजय भीमराव सुलताने, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जि. प. बांधकाम उपविभाग, भिवंडी-अभियंता तसेच रंगभूमीवरील कलावंत म्हणून उल्लेखनीय कार्य

चौकट :
पदोन्नती
उपअभियंता पदावर पदोन्नती राजेंद्र नाळे, विजय विसावले, विजया पांढरे, मनोज क्षिरसागर, केतन चौधरी तर कनिष्ठ अभियंता (बांधकाम) पदावर पदोन्नती वसंत मोरे, भावना बेलदार, किरण गोतारणे, माधुरी दांडकर, गौरव शिंदे, अमेय पाटील, विजय सुलताने, वसंतकुमार निरगुडे, प्रशांत पवार यांना पदोन्नती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT