नवरात्रोत्सवासाठी १६८ अर्ज दाखल
ठाण्यातील २४ मंडळांना परवानगी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : नवरात्रोत्सवाच्या काळात उभारण्यात येणाऱ्या मंडप, लाउड स्पीकर यांच्यासह विविध परवानग्या घेणे मंडळांना बंधनकारक आहे. या परवानग्या घेण्यासाठी मंडळांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी गणेशोत्सवाप्रमाणे नारात्रोत्सवातदेखील मंडप उभारणीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत १६८ मंडळांनी मंडप उभारणीच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केले असून, त्यापैकी २४ मंडळांना परवानगी दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
यंदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवदेखील मोठ्या धूमधड्याक्यात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी दांडिया रास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी मंडप उभारणीबरोबरच लाउड स्पीकर लावणे तसेच वाहतुकीस अडथला ठरू नये, यासह विविध बाबींचा विचार करता विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. या परवानग्या घेण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांची फरपट होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाकडून पुढाकार घेत ऑनलाइन पद्धतीसोबतच ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत महापालिकेकडे दोन्ही पद्धतीने १६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २४ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, तर १९२ मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. यात ऑनलाइन पद्धतीने ५२ तर ऑफलाइन पद्धतीने १४० अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने प्रभाग समितीमधील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून मंडपाच्या आकाराची पाहणी करण्यात येत असते. त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी जात असतात. यामध्ये स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन विभाग या विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मंडळांना मंडप उभारणीची परवानगी देण्यात येते.
प्रभाग समिती प्राप्त अर्ज परवानगी
नौपाडा १० ००
कोपरी ०९ ००
वागळे १६ ००
लोकमान्य २६ ०५
वर्तकनगर २१ ०२
माजिवडा ४६ १७
उथळसर १५ ००
कळवा १५ ००
मुंब्रा ०१ ००
दिवा १२ ००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.