भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : भिवंडी न्यायालयात लोकअदालतीतून वाहतूक विभागाने शनिवारी (ता. १३) मोठ्या प्रमाणावर दंडवसुली केली. सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन वाहतूक शाखांच्या कारवाईत १६८३ जणांकडून तब्बल १४ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
भिवंडी शहर, नारपोली आणि कोनगाव या तीन वाहतूक शाखा या कार्यालयांतर्गत कार्यरत आहेत. अवजड वाहनांची वर्दळ, विरुद्ध दिशेने वाहनचालकांची बेफिकिरी आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ई-चलनच्या माध्यमातून कारवाई केली जाते. या लोकअदालतीत सर्वाधिक दंडवसुलीमध्ये नारपोली वाहतूक शाखा अव्वल ठरली. या शाखेने ९०७ ई-चलनांतर्गत सहा लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यापाठोपाठ कल्याण नाका वाहतूक शाखेने ५१४ ई-चलनांतर्गत पाच लाख ३४ हजार ३०० रुपये वसूल केले. तर कोनगाव शाखेने २६२ ई-चलनांतर्गत दोन लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. एकाच दिवसात लोकअदालतीच्या माध्यमातून झालेल्या या एकत्रित वसुलीमुळे वाहतूक विभागाने मोठे यश मिळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.