मुंबई

जलबोगद्याद्वारे नवी मुंबईला पाणीपुरवठा हेटवणे धरणाला ब्लास्टिंगचा धोका ?

CD

हेटवणे धरणाला ब्लास्टिंगचा धोका?
जलबोगद्याद्वारे नवी मुंबईला पाणीपुरवठा; परिसरात धक्के
पेण, ता. १६ (वार्ताहर) : पेणच्या हेटवणे धरणाचे पाणी तालुक्यातील वाशी खारेपाट भागाला न मिळता थेट नवी मुंबईला जलबोगदाद्वारे जास्त प्रवाहाने मिळाणार आहे. यासाठी होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.
हेटवणे धरणाची निर्मिती तालुक्याच्या सिंचनासह येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खऱ्या अर्थाने करण्यात आली, मात्र हे पाणी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला दिले जात असताना हे पाणी तेथील नागरिकांना जास्त प्रवाहाने मिळावे याकरिता मेघा इंजिनिअर कंपनी जिते आणि बेलवडे येथे जवळपास तीनशे फूट जलबोगद्याची निर्मिती केली जात आहे. याकरिता येथे मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंगचे काम सुरू झाल्याने धरणाला धोका पोहोचणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे जलबोगद्यासाठी सिडकोने जलसंपदा विभागाची परवानगी घेतली आहे का, ब्लास्टिंग करण्यासाठी गौण खनिज विभागाची परवानगी, ब्लास्टिंगसाठी किती रॉयल्टी भरली आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना होणारा धोका याची परिपूर्ण माहिती येथील प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे आहे, असे नंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे. त्यातच खारेपाटातील नागरिकांना हेटवणे धरणाच्या पाण्यासाठी आजतागायत संघर्ष करावा लागत असताना सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला जास्त प्रवाहाने पाणी मिळण्यासाठी जलबोगद्याद्वारे काम जोरदारपणे सुरू आहे ते गंभीर असून, याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

हेटवणे धरणाचे पाणी सर्वप्रथम पेणकरांसाठी आहे, मात्र सिडको नवी मुंबईला जलबोगद्याद्वारे जिते आणि बेलवडे हद्दीत ब्लास्टिंग करून ग्रॅव्हिटीने पाणी तेथील वसाहतींना घेऊन जात आहेत. एकतर धरणाला धोका निर्माण होणार नाही असा कायदा असतानाही याकडे डोळेझाक करून जलबोगदा खोदण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पाली भागातील महागाव येथे भूकंपाचा धक्का जाणवल्याचे समजते. बेलवडेजवळील घरांनासुद्धा यामुळे तडे गेले असे असतानाही याबाबत संबंधित प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. एकतर हेटवणे धरणाचे पाणी फक्त आणि फक्त पेणकरांसाठीच आहे. त्यामुळे वेळ पडल्यास संघर्षाची भूमिका घेतली जाईल.
- नंदा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT