पाच कोटी जिंकण्याची संधी
पनवेल तालुक्यात‘समृद्ध पंचायतराज’ अभियान
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियान राबवण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील ७१ गावांतील ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, हरित गाव अशा मूलभूत सोयीसुविधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यास पाच कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
गावातील विकासकामांमध्ये गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, युवकांच्या सहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना पहिल्या फेरीत ५० लाख, दुसऱ्या फेरीत ३० लाख, तिसऱ्या फेरीत २० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी पारदर्शक प्रशासन, लोकसहभागातून विकासकामे राबवून तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पनवेल गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी केले आहे.
------------------------------------------
बक्षिसांचे स्वरूप
तालुका - प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख, तृतीय आठ लाख
जिल्हा - प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख, तृतीय २० लाख
विभाग - प्रथम एक कोटी, द्वितीय ८० लाख, तृतीय ६० लाख
राज्य - पाच कोटी, द्वितीय तीन कोटी, तृतीय दोन कोटी रुपये
---------------------------------------
स्पर्धेसाठीचे निकष
आपले सरकारमधून ५९२ सेवा ऑनलाइन देणे, गावात सीसीटीव्ही बसवणे, आयुष्मान कार्ड तयार करणे, घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वसूल करणे, लोकवर्गणीतून लोकोपयोगी कामे करणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाय करणे, जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव, सौरऊर्जेच्या वापरातून वीजदेयके शून्यावर आणणे, वृक्षलागवड व संवर्धन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, रोजगार योजनेची अंमलबजावणी, बायोगॅस, शेळीपालन शेड, कांदा चाळ कामे, शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणे, स्मशानभूमी विकसित करणे, मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करणे, बचत गटांचा सक्रिय सहभाग घेणे, महिलांना लखपती दीदी करणे.
-------------------------------------
पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, हरित गाव आणि पारदर्शक प्रशासन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी. या अभियानातून आदर्श गाव निर्माण करणे, ही स्पर्धेची खरी भावना आहे.
- समीर वाठारकर, गटविकास अधिकारी, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.