अनिल अंबानी, राणा कपूरविरोधात सीबीआयचे आरोपपत्र सादर
मुंबई, ता. १८ : येस बँकेच्या २,७९६ कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने उद्योजक अनिल अंबानी आणि बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.
बँक तसेच राणा कपूर यांच्या कुटुंबीयांनी हे पैसे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या आरसीएफएल आणि आरएचएफएल या कंपन्यांमध्ये गुंतवले होते; मात्र नंतर वेगवेगळ्या मार्गांनी त्या पैशांचा अपहार करण्यात आला व त्यामुळे बँकेला मोठा तोटा झाला, असे सीबीआयने म्हटले आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले. आरसीएफएल आणि आरएचएफएल यांची मुख्य कंपनी रिलायन्स कॅपिटलचे संचालक या नात्याने अनिल अंबानींविरुद्धही आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. अंबानी यांच्याखेरीज राणा कपूर, बिंदू कपूर, राधा कपूर व रोशनी कपूर यांच्याविरुद्ध तसेच अन्य काही कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेनुसार हे आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआयने २०२२मध्ये कपूर यांच्याविरुद्ध तसेच रिलायन्स कमर्शिअल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले होते. बँकेच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल झाले होते.
...
सीबीआयचे म्हणणे काय?
या पैशांची अफरातफर करण्यासाठी राणा कपूर आणि अनिल अंबानी यांनी कट रचला होता. कपूर यांनी रिलायन्सच्या उपकंपन्यांमध्ये हे पैसे गुंतवल्यानंतर, अनिल अंबानी समूहाने तोट्यात चाललेल्या कपूर कुटुंबीयांच्या काही संस्थांना स्वस्त व्याजदरात कर्ज देऊन त्यात गुंतवणूक केली. त्यामुळे येस बँकेला मोठा तोटा झाला आणि अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्यांना तसेच राणा कपूर यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठा फायदा झाला, असे सीबीआयचे म्हणणे आहे.
...
असे झाले व्यवहार
रिलायन्स कॅपिटलची अन्य उपकंपनी, रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडाने अनिल अंबानी यांच्या आदेशावरून १,१६० कोटी रुपये कपूर कुटुंबीयांच्या मॉर्गन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवले, तर रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडाने येस बँकेकडून २५० कोटी रुपयांचे अनिल अंबानी ग्रुपचे कर्जरोखे खरेदी केले. तसेच रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडाने येस बँकेच्या असुरक्षित कर्जरोख्यांमध्येही १,७५० कोटी रुपये गुंतवले, असे सीबीआयने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.