रान डुक्करांचा शेतांमध्ये हैदोस
खांब-देवकान्हे विभागातील भातपिकांचे नुकसान
रोहा ता.२०(बातमीदार)ः रोहे तालुक्यातील खांब, देवकान्हे भागातील बहरलेल्या भात पीके रान डुक्करांनी जमीनदोस्त केली आहेत. त्यामुळे आता तोंडाशी असलेले पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागात तळवली, नडवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे येथे रानटी डुक्करांनी हैदोस घातला आहे. दहा पंधरा दिवसांवर कापणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजांवर संकटात सापडला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे.
-----------------------------------
रान डुक्करांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. रानातून येणारे कळप रात्रभर शेताची नासधूस करतात. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
- शिवाजी खांडेकर, शेतकरी, चिल्हे.