मुंबई

स्‍वच्छ किनारपट्टीसाठी मुरुडकर सरसावले

CD

स्‍वच्छ किनारपट्टीसाठी मुरूडकर सरसावले
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त शेकडो हात एकवटले; दोन टनांहून अधिक कचरा गोळा
मुरूड, ता. २० (वार्ताहर) : पर्यावरण संवर्धनासोबत किनारपट्टी स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून मुरूडमध्ये भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वसंतराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट, जीवन दीर्घ शिक्षण विस्तार विभाग, राष्ट्रीय किनारा संशोधन केंद्र (चेन्नई) आणि मुरूड-जंजिरा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या मोहिमेचे उद्घाटन मुरूड तहसीलदार आदेश डफळे व पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या उपस्थितीत झाले. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, एनएसएस प्रमुख डॉ. श्रीशैल बहिरगुंडे, संजीवनी आरोग्य केंद्राचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. विश्वास चव्हाण, राज्य मच्छीमार संघाचे सदस्य मनोहर बैले, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर, बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, डॉ. नारायण बागूल, डॉ. सीमा नाहिद आदी मान्यवर या उपक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांना परिसर व किनारा स्वच्छ ठेवण्याची शपथ देण्यात आली. यानंतर स्वयंसेवक व नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर एकत्रित काम करीत जवळपास दोन टनांहून अधिक कचरा गोळा केला. या मोहिमेत प्लॅस्टिक, थर्माकोल, काच व अन्य कचऱ्याचे मोठ्या प्रमाणावर संकलन करण्यात आले. नगर परिषदेच्या वतीने स्वच्छतादूतांना मास्क आणि हँडग्लोज देण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. कांबळे यांनी राष्ट्रीय किनारा संशोधन केंद्राने मुरूड महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल आभार मानले आणि नागरिकांनी सतत जागरूक राहून किनारपट्टी स्वच्छ ठेवावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. विश्वास चव्हाण म्हणाले, की पर्यटनदृष्ट्या मुरूड किनारा महत्त्वाचा असून स्वच्छ किनारा पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि पर्यटन वाढविण्यासाठी अत्यावश्यक आहे. नगर परिषद सातत्याने स्वच्छता करतेच परंतु नागरिकांच्या सक्रिय सहकार्यानेच हे काम अधिक परिणामकारक होऊ शकते.
मुरूड तहसीलदार आदेश डफळे यांनी स्वच्छतेला सामाजिक जबाबदारी मानून प्रत्येकाने स्वतःपासून बदल घडवावा, असे आवाहन केले. पोलिस निरीक्षक कांबळे यांनी युवकांनी या मोहिमेत घेतलेला सहभाग अनुकरणीय असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष म्हात्रे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. बागूल यांनी केले. या मोहिमेमुळे मुरूडकरांनी किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करीत पर्यावरण संवर्धनासाठी एक नवा आदर्श ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Rain : कोलकातामध्ये पावसाने मोडला ३७ वर्षांचा विक्रम, रस्ते वाहतूक ठप्प; रेल्वे- विमाने रद्द, ८ जणांचा मृत्यू

Arshdeep Singh: एक ही सरदार, पाकिस्तानी गार! अर्शदीपने Haris Rauf च्या 'विमान' सेलिब्रेशनचं काय केलं ते पाहा... Viral Video

Diwali Gifts: सरकारी पैशांचा वापर करून दिवाळी भेटवस्तू देण्यावर बंदी, अर्थ मंत्रालयाकडून सर्व मंत्रालये आणि विभागांना आदेश

Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ८ जणांचा सामूहिक अत्याचार; नातेवाईकाने मित्रांना बोलावले अन्...

Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी २३ कक्षांची स्थापना

SCROLL FOR NEXT