उल्हासनगरात साई-सेनाची नवी युती
भाजपच्या हातातून सत्ताच्या चाव्या जाणार?
उल्हासनगर, ता १९ (वार्ताहर) : नेहमीच सत्तेची किल्ली हातात ठेवणाऱ्या साई पक्षाने यंदा शिंदेच्या सेनेसोबत हातमिळवणी करून निवडणूक रिंगणात साई-सेना नावाने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीने शहरातील राजकीय समीकरणे पालटली आहेत. यामुळे भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले असून, आगामी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
रिजेंसी हॉटेल येथे गुरुवारी (ता. १८) कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि साई पक्षप्रमुख जीवन इदनानी यांनी युतीची घोषणा केली. या कार्यक्रमात दोन्ही पक्षांनी साई-सेना या नावाने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. माजी महापौर आशा इदनानी यांनी यावेळी सांगितले, उल्हासनगरचा विकास हा आमच्या अजेंड्याचा केंद्रबिंदू आहे. श्रीकांत शिंदे यांसारखे तरुण खासदार सोबत असल्याने प्रकल्पांना गती मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सभेला शिवसेना नेते गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, राजेंद्र चौधरी, अरुण आशान, राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, नवीन दुधानी, इंदिरा उदासी, सुनील गंगवानी, ॲड. हरेश इदनानी, ॲड. जनक इदनानी, कुमार चैनानी यांच्यासह शेकडो शिवसेना व साई पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
युतीला टीम ओमी कालानीचा पाठिंबा
साई पक्षाने महापालिकेच्या राजकारणात नेहमीच निर्णायक भूमिका बजावली आहे. नगरसेवकांची संख्या मर्यादित असली तरीही सत्तेची किल्ली कायम आपल्या हातात ठेवली. मात्र, त्यांनी थेट शिंदेंसोबत हातमिळवणी करत विकासासाठी एकत्र हा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, या युतीला टीम ओमी कालानीचा देखील पाठिंबा मिळाला आहे, यामुळे ही आघाडी शहरात अधिक भक्कम ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.