मुंबई

दूषित पाण्यामुळे खालावली कर्मचाऱ्यांची प्रकृती

CD

दूषित पाण्यामुळे खालावली कर्मचाऱ्यांची प्रकृती
अंबरनाथमधील ऑर्डनन्स फॅक्टरीमधील घटना
अंबरनाथ, ता. २० (वार्ताहर) : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीतील एमटीपीएफ विभागात शुक्रवारी (ता. १९) सकाळी दूषित पाणी प्यायल्यामुळे सुमारे २० कर्मचाऱ्यांची तब्येत अचानक बिघडली. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच कर्मचाऱ्यांना उलट्या, मळमळ, चक्कर येणे व थकवा अशा लक्षणांचा अनुभव येऊ लागला. ही बाब लक्षात येताच संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी सकाळच्या नाश्त्यानंतर कारखान्यातील कुलरमधून पाणी प्यायले होते आणि काही वेळातच त्यांना त्रास होऊ लागला. आरंभात केवळ ३-४ कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला, परंतु काही वेळातच गोकुळ ठाकूर, चेतन थरता, नागेंद्र शिंदे, रमेश एल. व्ही., मिनिमल शिवम्मा, तेजस दिवाण, यशवंत जाधव आदींसह एकूण २० कर्मचाऱ्यांना लक्षणे दिसू लागली. या प्रकारानंतर कारखान्यात खळबळ उडाली. सुरुवातीला या कर्मचाऱ्यांना कारखान्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सर्वांना अधिक वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

घटनेनंतर कुलरची तपासणी करण्यात आली असता, त्यातील फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली आढळली, तसेच साफसफाईचा अभाव होता. वेळेवर देखभाल न केल्यानेच ही गंभीर स्थिती निर्माण झाली, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. सध्या संबंधित यंत्रणेकडून चौकशी सुरू असून, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी कर्मचारीवर्गातून होत आहे.

व्यवस्थेतील ढिसाळपणा
ही घटना केवळ निष्काळजीचे उदाहरण नसून, कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्याबाबतच्या व्यवस्थेतील ढिसाळपणाचे प्रतीक ठरत आहे. यामुळे कारखान्यातील कामगारांच्या आरोग्याची गंभीर पातळीवर दखल घेऊन दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul price cut News : ‘अमूल’ने घेतला मोठा निर्णय! तब्बल ७०० पेक्षा अधिक उत्पादनांच्या किंमतीत केली घट

Dandiya Function : कोल्हापुरात नवरात्रोत्सवात रास दांडिया खेळण्यासाठी जय्यत तयारी, विविध ठिकाणी होणार कार्यक्रम; इथे उत्साह वाढवा

Motala Crime : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये विवाहितेचा विनयभंग; पुण्यावरून येताना घडली घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Smriti Mandhana: स्मृती मानधनाने मोडला Virat Kohli चा मोठा विक्रम! भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंनाही नाही जमला असा पराक्रम केला

Latest Marathi News Live Update : माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT