‘प्रेरणा रास’चे मुलुंडमध्ये आयोजन
मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः ईशान्य मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जाणारा प्रेरणा रास यंदा अधिक भव्य, अधिक आकर्षक आणि नव्या जोशात साजरा होणार आहे. परंपरा व आधुनिकतेचा सुंदर मेळ घालणारा हा उत्सव गेली १८ वर्षे सलग एकाच मैदानावर आयोजित केला जात आहे. खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (ता. २२) ते गुरुवार (२ ऑक्टोबर) या कालावधीत मुलुंडच्या कालिदास मैदानावर दररोज संध्याकाळी सात वाजता माता अंबेमातेच्या आरतीने कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यानंतर दांडिया-गरब्याचा सोहळा रंगणार आहे. दररोज विविध स्पर्धा, आकर्षक बक्षिसे, विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राऊंड तसेच महाआरती या उपक्रमांमुळे प्रेरणा रास नवरात्रोत्सव मुलुंडकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. खासदार मनोज कोटक म्हणाले, प्रेरणा रास हा केवळ नवरात्रोत्सव नाही, तर मुलुंडच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भक्ती, आस्था आणि आधुनिकतेचा संगम घडवत २०२५ मध्येही आम्ही मुलुंडकरांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.