नवराेत्सवात जिंका मानाची पैठणी!
‘सकाळ’ प्रस्तुत नवरात्र नवरंग स्पर्धेची पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : आदिशक्तीचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (ता. २२) प्रारंभ होत आहे. स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. आधुनिक स्त्री ही अनेक आघाड्यांवर संघर्ष करीत असते. तिचा हा प्रवास अधिक सुखकारक व्हावा, यंदाचा नवरात्र उत्सव तिच्यासाठी विशेष ठरावा, यासाठी ‘सकाळ’ प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून ‘सकाळ’ आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या सहयोगाने महिलांसाठी नवरात्र नवरंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. स्त्रीशक्तीच्या, आदिशक्तीच्या विविध रूपांच्या पूजनाचा उत्सव. चैतन्याचा उत्सव. त्यामुळे नऊ दिवस सकारात्मक ऊर्जा, नवचैतन्य संचारलेले असते. नवरात्रात मानाची पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. नवरात्रात नऊ रंगांना धार्मिक महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्त्वाचे स्थान आहे. मानवी आयुष्यात ते आनंद निर्माण करणारे असतात.
कशी आहे स्पर्धा?
प्रत्येक दिवसाशी निगडित रंगाच्या साड्या परिधान करून त्याचा ग्रुप फोटो ‘सकाळ’कडे पाठवायचा आहे.
ग्रुपमधून एक महिला निवडली जाईल आणि तो फोटो ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केला जाईल. भाग्यवान महिलेच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाईल. ती महिला त्या दिवसाच्या पैठणीची मानकरी असेल.
विजेत्यांना ‘सकाळ’मधून संपर्क साधला जाईल. नऊ दिवसांतील सर्व फोटोंमधून एक भाग्यवान विजेते निवडण्यात येणार असून, तिला बंपर बक्षीस म्हणून खास पैठणी देण्यात येणार आहे.
नवरात्र संपल्यानंतर नऊ विजेत्या व बंपर विजेत्या यांना महाराष्ट्र बाजारपेठ येथे पैठणी बक्षीस देण्यात येईल. विजेत्यांनी फोटो प्रसिद्ध झालेला ‘सकाळ’चा अंक जपून ठेवावा.
स्पर्धकांसाठी महत्त्वाचे...
- फोटोखाली ग्रुपचे नाव व ठिकाणाचा उल्लेख असावा.
- जुना फोटो पाठवू नये
- रोज दुपारी तीन वाजण्याच्या आत ग्रुप फोटो पाठवावा.
- व्हाॅट्सॲप क्रमांक केवळ फोटो पाठवण्यासाठी आहे. त्यावर कोणीही फोन करू नये.
- फोटो निवडीचे सर्व अधिकार ‘सकाळ’कडे असतील.
* फोटो पाठवण्यासाठी व्हाॅट्सॲप क्रमांक - ९०८२२७५४७०