मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तिघांना अटक
ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई
चेंबूर, ता. २१ (बातमीदार) ः मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तिघा जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती सागर मानकर (३५), कृष्णा लिंबाजी राठोड (२५), सनी कृष्णकांत विश्वकर्मा (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोवंडी परिसरातील सायन-ट्रॉम्बे मार्गावरील बारी रेसिडेन्सीमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपायुक्त परिमंडळ सहा यांना मिळाली. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम कोयंडे, सुशील लोंढे व पथक यांनी ही कारवाई केली.
स्पा चालवणारा मालक, चालक, व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा नोंद करून यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच तीन पीडित मुलींना सोडवण्यात आले आहे.