सिंदूरातून तयार केली पंतप्रधान मोदींची अनोखी कलाकृती
कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक प्रा. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी एक अनोखी कलाकृती साकारली. विविध प्रकारच्या सिंदूरांची, पावडर, स्टिक, द्रव, लाल, सिंदुरी, पिवळा व मरून रंगांचा वापर करून मोदीजींचे आकर्षक चित्र त्यांनी रेखाटले. या कलाकृतीसाठीची प्रेरणा त्यांना ऑपरेशन सिंदूरमधून मिळाली.
हिंदू संस्कृतीत सिंदूर हे सौभाग्य, प्रेम आणि सुहागाचे प्रतीक मानले जाते. पतीचे दीर्घायुष्य, सकारात्मक ऊर्जा व सुरक्षिततेशी त्याचा संबंध आहे. डॉ. दिनेश गुप्ता यांची ही अनोखी कला चर्चेचा विषय ठरला आहे. पुरस्कार मिळेल किंवा नाही, पण नवनवीन शोध आणि सर्जनशीलता सतत सुरूच राहिली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.