मुंबई

आरसीएफ शाळा पूर्ववत सुरू ठेवा

CD

आरसीएफ शाळा पूर्ववत सुरू ठेवा
शिक्षण संचालकांचे आदेश; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिलासा
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः तालुक्यातील कुरूळ येथील आरसीएफ कंपनीने स्थापन केलेल्या शाळेच्या व्यवस्थापनावरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे. अखेर विद्यार्थी व शिक्षकांचे हित पाहता, शिक्षण संचालकांनी थेट हस्तक्षेप केला आहे. १,१०० विद्यार्थी व तब्बल ८० शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, यासाठी शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संस्थांमधील वाद थांबवून कामकाज पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश ३ सप्टेंबर २०२५च्या पत्रानुसार दिले आहेत. त्यामुळे आरसीएफची शाळा सुरू राहण्याची अडचण दूर झाली आहे.
भूमिपुत्रांच्या जमिनीवर उभी राहिलेल्या आरसीएफ कंपनीने त्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उभारली; मात्र आता या शाळेकडेच कंपनीने पाठ फिरवल्याचा आरोप पालक व शिक्षक करीत आहेत. शाळेच्या व्यवस्थापनावरून आरसीएफ कंपनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये वाद उफाळला आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी हस्तक्षेप करून न्यायालयीन प्रक्रिया किंवा संस्थेची निवड पूर्ण होईपर्यंत शाळेचे कामकाज पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही संस्थांनी संचालनालयास हमीपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व इतर खर्च करारानुसार उचलण्याची जबाबदारीही घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
............
नवीन शैक्षणिक संस्‍थेची निवड
१,१०० विद्यार्थी व ८० शिक्षक-कर्मचाऱ्यांचे हित बाधित होणार नाही, याची डेक्कन एज्युकेशन सोसायटीने दक्षता घ्यावी. जर डेक्कन एज्युकेशन सोसायटी माघार घेतली, तर आरसीएफ कंपनीने नवीन शैक्षणिक संस्थेची निवड करून शासन निर्णयानुसार हस्तांतरण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि आरसीएफ कंपनीच्या वादामुळे पालक व स्थानिक नागरिकांचा संताप उफाळला आहे. भूमिपुत्रांनी दिलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या कंपनीने जर शिक्षणाचा खर्च टाळण्याचा खेळ सुरू केला, तर हा विश्वासघात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

IND vs PAK, Asia Cup: सूर्यकुमारने जिंकला टॉस, प्लेइंग-११ मध्ये बदल; दोन्ही कर्णधारांमध्ये हस्तांदोलन झालं?

inspiring Women Story: 'लग्नानंतर २३ वर्षांनी पदव्युत्तर पदवी; माधुरी नवले यांनी पटकाविले सुवर्ण'; कौटुंबिक जबाबदारी सांभाळत केला अभ्यास

Kunbi Note: 'साेलापूर जिल्ह्यात कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण'; गाव, आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्र

Latest Marathi News Live Update : सासवड शहरात बँड पथकाच्या तालावर देखण्या सर्जा राजाची मिरवणूक

SCROLL FOR NEXT