मुंबई

घातक कचऱ्यामुळे माशांचा मृत्यू

CD

प्रदूषणामुळे तलावातील मासे मृत
नैसर्गिक तलावाजवळ रासायनिक घनकचरा विल्हेवाटीचा प्रयत्न; पाणी वापरास अयोग्य
बोईसर, ता. २१ (बातमीदार) ः बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा परिसरातील निर्जन जागी बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्या रासायनिक घनकचऱ्यामुळे तलावातील मासे मृत होण्याचा प्रकार उघड झाला असून तलावातील पाणी वापरास अयोग्य बनले आहे. याबाबत उच्चेळी ग्रामपंचायतीने रासायनिक घनकचरा उघड्यावर टाकून प्रदूषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
पथराळीजवळील उच्चेळी ग्रामपंचायत हद्दीतील तलावात गुरुवारी (ता. १८) रात्री रासायनिक घातक घनकचरा टाकल्याने गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडले असून जलचरांसह परिसरातील शेळ्या व इतर जनावरांवरही मृत्यूचे सावट पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पाचमार्ग येथून पथराळीमार्गे दांडीकडे जाणाऱ्या मार्गावरून अज्ञात व्यक्तींनी रसायनाने भरलेल्या अनेक गोण्या तलावात टाकल्या. रसायनांच्या तीव्रतेमुळे तलावाच्या काठावरील हिरवे गवत जळून खाक झाले, तर पाण्यातील जलचरांचा बळी गेला. या घनकचऱ्याचा स्रोत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औद्योगिक क्षेत्राजवळील उच्चेळी येथील निर्जन परिसरात असलेल्या नैसर्गिक तलावाजवळ आठवडाभरापूर्वी रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनातून रासायनिक घनकचरा भरलेल्या गोण्या बेकायदा टाकण्यात आल्या. पावसामुळे या गोण्यांमधील रासायनिक घनकचरा तलावाच्या पाण्यात मिसळून शेकडो मासे मृत झाले. त्याचप्रमाणे तलावाच्या काठावरील हिरवे गवतदेखील जळून गेले. उच्चेळी येथील तलावातील पाण्याचा परिसरातील शेतकरी उन्हाळ्यात वापर करीत असून पाळीव जनावरांना धुण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा उपयोग होतो. तारापूर औद्योगिक परिसरातील गावांच्या हद्दीत रासायनिक घनकचरा व औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढीस लागल्याने शेती, बागायती, पिण्याचे पाण्याचे स्रोत, नाले, तलाव, खाडी आणि समुद्र प्रदूषित होऊन पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पिण्याच्या पाण्याच्या समस्या गंभीर
कुडण गावातील तलावात व दहिसर गावातील शेतात रासायनिक घनकचरा आढळून आल्याची उदाहरणे आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी पालघर यांना लेखी तक्रार देण्यात आली असल्याचे उच्चेळीचे सरपंच जितेंद्र खटाळे यांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा केमिकल माफियांच्या सक्रिय कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासकीय स्तरावर कारवाई होत नसल्याने संतापाचे वातावरण आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, रासायनिक घनकचरा आणि औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट इत्यादी गैरप्रकार रोखण्यात तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाला अपयश येत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना आहे. उच्चेळी येथील तलावाजवळ टाकण्यात आलेल्या रासायनिक घनकचऱ्याबाबत तक्रार केल्यानंतर तातडीने पाहणी करणे आवश्यक असताना दोन दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यास वेळ मिळाला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

प्रतिक्रिया
उच्चेळी येथील तलावाजवळ गोण्यांमध्ये भरलेला रासायनिक घनकचरा टाकण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी क्षेत्र अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन घनकचऱ्याचे नमुने ताब्यात घेण्यास सांगितले असून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तलावाच्या पाण्याचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविणार आहे.
- वीरेंद्र सिंह, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर-२

प्रतिक्रिया
उच्चेळी येथील तलावाजवळ आठवडाभरापूर्वी रासायनिक घनकचरा फेकण्यात आला असून दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात लिखित तक्रार देण्यात आली आहे.
- जितेंद्र खटाळे, सरपंच, उच्चेळी ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: 'वीरशैव अन्‌ लिंगायत एकच; नवीन धर्माला नाही पाठिंबा'; हुबळीतील संमेलनात चार जगद्‌गुरू..

Suji Chila Vs Besan Chilla Vs Wheat Roti: रवा चिला, बेसण चिला कि चपाती? वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर?

Air Pollution: वायू प्रदूषणाच्या संकटावर मात! पनवेल पालिकेची १० ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा

U19 IND vs U19 AUS: भारताने फक्त ३१ ओव्हरमध्ये पार केलं ऑस्ट्रेलियाचं मोठं लक्ष्य; पहिल्या वनडेत दणदणीत विजय

PM Modi: आधी व्यापाऱ्यांच्या वेदनेचा संघर्ष सांगितला; नंतर नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाला कोणता नवा मंत्र दिला?

SCROLL FOR NEXT