सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : आई भवानीचा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी ठाणे पोलिसही बंदोबस्ताचा जागर करणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. खाकी वर्दीतील पोलिस बंदोबस्तावर असणार आहेत, पण त्यासोबतच साध्या वेशातील पोलिसही गरबा, दांडियाच्या ठिकाणी नजर ठेवून राहणार आहेत. विशेष म्हणजे रोडरोमिओंसह चोरांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवात प्लाझ्मा, बीम लाइट, लेझर बीम लाइटचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. शहरातील टेंभीनाक्यावर साजरा होणारा दुर्गेश्वरीच्या उत्सवासाठी हजारो भाविक येत असल्यामुळे शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या वेळी भरणारी जत्रा हा आकर्षणाचा विषय असतो. या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी मुख्यमंत्र्यांपासून ते विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, मंत्री हजेरी लावतात. त्यात आगामी पालिका निवडणुकांची नांदी लागल्याने यंदाच्या नवरात्रोत्सवात राजकीय पक्षांचा सहभाग पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकीकडे देवीचा भक्तिभावाने होणारा जागर आणि रासगरबासाठी तरुणाईचा उत्साह पाहता पोलिसांनी सर्व पाच परिमंडळांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे.
पोलिस उच्च अधिकारी, अधिकारी, महिला अधिकारी, महिला कर्मचारी, स्थानिक पोलिस ठाण्याची आणि परिमंडळ पोलिसांची विशेष गस्ती पथके गस्तीवर राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवणार आहे. सोबत सीसीटीव्ही, ड्रोनची करडी नजर राहणार आहे. ठाणे पोलिसांची नजर व्हाॅट्सअप आणि समाजमाध्यमांवर करडी नजर असून, गर्दीची ठिकाणे आणि नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
असा आहे पोलिस बंदोबस्त...
पोलिस उपआयुक्त १०, सहाय्यक आयुक्त १८, निरीक्षक १६, सहाय्यक पोलिस (उप)निरीक्षक ४४, महिला अधिकारी ३३, पुरुष अंमलदार २६७३, महिला अंमलदार ६१०, एसआरपीएफ कंपनी एक, जीप ५२, वॉकी टॉकी १००, दुर्बीण दोन, डीएफ एमडी एक, एचएच एमडी दोन असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांवर नजर!
नवरात्रोत्सवात धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, पोस्ट, व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून काही समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा व्यक्तींवर लक्ष ठेवून त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या सोशल मीडिया सेलदेखील सतर्क करण्यात आले आहे.
तक्रारींसाठी मदतकेंद्र
मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १००, ११२, नियंत्रण कक्ष, ठाणे शहर ९१३७६६३८३९ या क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.