रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम म्हात्रेंची भेट
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण व नागरी विकासमंत्री रवींद्र चव्हाण यांची निवासस्थानी भेट घेतली. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट घेतल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या भेटीत प्रीतम म्हात्रे यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.