मुंबई

रोहा संघ ठरला सागरी सुरक्षा चषकाचा मानकरी

CD

रोहा संघ ठरला सागरी सुरक्षा चषकाचा मानकरी
अलिबागच्या समुद्रकिनारी रंगला कबड्डीचा थरार
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः रायगड पोलिसांच्या वतीने सागरी सुरक्षा चषक साखळी कबड्डी स्पर्धेचे १२ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम लढत रविवारी (ता. २१) रोहा आणि मुरूड संघात झाली. रोहा संघाने मुरूड संघावर मात करीत विजेतेपदावर नाव कोरले. या संघाला ५१ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. रविवारी सायंकाळी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर कबड्डीचा थरार रंगला. या स्पर्धेचा आनंद हजारो क्रीडाप्रेमींनी तसेच पर्यटकांनी लुटला.
मच्छीमार, सुरक्षा दल यांच्यासमवेत समन्वय राखण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत कायम संवाद साधण्यासाठी पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सागरी सुरक्षा चषक कबड्डी साखळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा शुभारंभ मांडवा बंदरावर झाला. त्यानंतर मुरूड, रेवदंडा, श्रीवधन येथील समुद्रकिनारी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेची उपउपांत्य फेरी शनिवारी सायंकाळी अलिबाग समुद्रकिनारी झाली. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. त्यातून नागोठणे, पोयनाड, रोहा, मुरूड या चार संघांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली. रविवारी सायंकाळी उपांत्य फेरीला सुरुवात झाली. पहिली उपांत्य फेरीचा सामना पद्मदूर्ग मुरूड आणि नागोठणे फायटर बुल्स या संघात झाला. नागोठणे संघाने २१ आणि मुरूड संघाने ३१ गुण मिळवून मुरूड संघ विजयी झाला. या संघाची अंतिम सामन्यासाठी निवड झाली. दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना रोहा फायटर्स आणि किंग्ज ऑफ पोयनाड या संघात झाला. रोहा संघाने ३६ गुण मिळवून विजय संपादन केला. तिसऱ्या उपांत्य फेरीचा सामना नागोठणे आणि पोयनाड संघात झाला. यामध्ये नागोठणे संघाने २० आणि पोयनाड संघाने २४ गुण मिळविले. स्पर्धा अटीतटीची झाली. अखेर पोयनाड संघ विजयी झाला. अंतिम सामना रोहा व मुरूड संघात झाला. रोहा संघाने आघाडी घेत विजय आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत अटीतटीची झाली. अखेर रोहा संघाने मुरूड संघावर मात करीत अंतिम विजेतेपद पटकावले.
.........
रोहा संघाला रोख ५१ हजार रुपये व चषक, मुरूड संघाला द्वितीय क्रमांकाचे ३१ हजार रुपये व चषक, पोयनाड संघाला तृतीय क्रमांकाचे रोख २१ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून रोशन मढवी, उत्कृष्ट चढाई म्हणून अनिरुद्ध भोसले आणि उत्कृष्ट पकड म्हणून अतिश मोरे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अलिबागच्या उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांच्या हस्ते विजेत्या संघाचा आणि उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhirendra Shastri : गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडा, कारण...धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! आता बॅंकेत त्याच दिवशी क्लिअर होणार धनादेश (चेक); ‘आरबीआय’चे सर्व बॅंकांना परिपत्रक; खात्यात पैसे ठेवूनच द्यावा लागणार त्या तारखेचा चेक

Gadchiroli News : १०६ शरणागत माओवाद्यांनी गिरवले शिक्षणाचे धडे

Ladki Bahin Yojana : सरकारच्या लाडकी बहिण योजनेत चार हजार ९०० कोटींचा भष्ट्राचार; खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघाती आरोप

Pune Encroachment : आंदेकरच्या प्रभावक्षेत्रात अतिक्रमण कारवाई; माहिती देण्यास महापालिका अधिकाऱ्यांची टाळाटाळ

SCROLL FOR NEXT