मुंबई

शाहूनगर दवाखाना पूर्ण वेळ खुला

CD

शाहूनगर दवाखाना पूर्ण वेळ खुला
धारावी, ता. २२ (बातमीदार) : स्थानिक पातळीवर स्थानिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी पालिकेकडून दवाखाने चालवले जात आहेत. धारावीतील प्रत्येक वॉर्डात एक असे सात वॉर्डात सात दवाखाने आहेत. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे दवाखाने उघडे असतात. धारावीतील शाहूनगर येथील दवाखान्यात सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंतच केसपेपर दिला जात होता. त्यानंतर आलेल्या रुग्णांना परत पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’च्या १७ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत दिवसभर केसपेपर देणे सुरू केले आहे. त्‍यामुळे स्थानिक रहिवासी व रुग्ण समाधान व्यक्त करत आहेत.
ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या आदी आजारांवर या दवाखान्यात उपचार केले जातात. त्‍यामुळे गरीब रुग्ण दवाखान्यात उपचार घेण्यासाठी पसंती देतात. खासगी डॉक्टरकडे गेल्यास खर्च येत असल्याने पालिकेच्या दवखान्यात किरकोळ आजारासाठी मोठी गर्दी असते. दवाखाना पूर्णवेळ सुरू झाल्‍याने रहिवासी मोतीराम सावळे यांनी समाधान व्यक्‍त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीवूड-बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा! लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार; नवं वेळापत्रक कधी लागू होणार?

IND vs PAK: Impact Player मेडल जिंकताच तिलक वर्मा पडला पाया; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

Karad News : पडत्या काळात कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसला भरभक्कम करण्याचे नामदेव पाटील यांच्यासमोर आव्हान

Pune Crime : पत्नीच्या वेगळे राहण्याच्या मागणीला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT