मुंबई

अनोळखी टोळक्यांकडून दोन भावांना मारहाण

CD

अनोळखी टोळक्यांकडून दोन भावांना मारहाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर पडताना बंगल्याच्या गेटवरच अनोळखी आठ जणांच्या टोळक्याने दोन भावांना मारहाण करीत त्यांचे कपडेदेखील फाडल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. हा प्रकार रविवारी (ता. २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. तक्रारदार मोठ्या भावाच्या दोन्ही डोळ्यांच्या बाजूला जखमा झाल्या असून, टाकेही पडले आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कासारवडवली, आनंदनगर येथे राहणारे तक्रारदार नकुल सिंग (२५) यांनी दिलेल्या तक्रारीत ते राहत असलेल्या बिल्डिंग येथील जीत नावाच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्याने ओवळा येथील एका बंगल्यात वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीसाठी तक्रारदारांचा लहान भाऊ दिलीप (१६) हा गेला होता. रात्री साडेआठ वाजल्याने त्याला आणण्यासाठी तक्रारदार गेले होते. ते दोघे बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडताना, पाठीमागून आलेल्या एका अनोळखी मुलाने दिलीप याला मारले. त्या वेळी त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या तक्रारदारांना त्या मुलांनी मारहाण केली. त्या मुलांनी दोघा भावांचे कपडेदेखील फाडले. या वेळी दिलीप याचे मित्र दुचाकीवरून आल्यावर त्यांच्या दुचाकीवर बसून थेट खासगी रुग्णालय गाठले. या प्रकारात तक्रारदारांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला, डाव्या डोळ्याचा वरच्या बाजूला, कपाळाला उजव्या डोळ्याच्या खालच्या बाजूला जखमा झाल्या असून टाकेही पडले आहेत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अनोळखी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP : आम्ही एकत्रच ! पुण्यात एकाच फ्लेक्सवर झळकले शरद पवार, अजित पवार अन् सुप्रिया सुळेंचे फोटो, राज्यात चर्चेला उधाण

Rohit Pawar News: 'मदत मिळत नाही, आपण त्यांना गुडघ्यावर आणू' , रोहित पवारांचा कुणाला व्हिडीओ कॉल

Pune News : एसटीपी अद्ययावत करण्यासाठी पावणे नऊशे कोटीचा प्रकल्प; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

रस्त्याचे रूपांतर रेसिंग ट्रॅकमध्ये केले, पण ओला रस्ता लॅम्बोर्गिनीसाठी अडथळा बनला अन्...; भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर

अरे हा तर तोच सीन... 'लपंडाव' मालिकेत केली 'सैयारा'च्या त्या सीनची कॉपी; नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात

SCROLL FOR NEXT