मुंबई

नवरात्री सुरू होताच वाहन खरेदीसह अन्य वस्तूची खरेदी सुरू

CD

नवरात्रीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी जोमात
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : पितृपक्ष संपताच नवरात्रीला सुरुवात झाली असून, हा चैतन्याचा सण म्हणून ओळखला जातो. या मुहूर्तावर बाजारात खरेदीसाठी लगबग वाढली आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आली आहे. पितृपक्ष सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ काम केले जात नाही. त्यामुळे नवरात्री सुरू होताच नागरिकांकडून बुकिंग जोरात सुरू झाली आहे, तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर अधिकाधिक नव्या वस्तूंची खरेदी केली जाते.
नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार खरेदी केली आहे. त्यामुळे वाहन बाजारात चांगलीच तेजी अनुभवास आली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीकडे नागरिक वळत असल्याने इलेक्ट्रॉनिक बाजारातही चैतन्याचे वातावरण अनुभवास येत आहे. बाजारात नवनवीन वाहनाच्या मॉडेल व कंपन्यांच्या चारचाकी वाहनाची रेकॉर्ड ब्रेक बुकिंग झाली आहे, शिवाय काही विक्रेत्यांकडे नवरात्रीसाठी विशेष खरेदी ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे बाजारात चैतन्य आले असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या चारचाकी आणि दुचाकी बाजारात पूर्वीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी एकाला अटक! कोण आहे कांचन साळवी?

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरीच उपचार सुरू राहणार; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

Sangli Double killing Case : सांगलीत डबल मर्डरने खळबळ! दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंचा वाढदिनीच खून, मारणाऱ्याचाही जागेवरच खात्मा

J&K पोलिसांनी देशाला मोठ्या संकटापासून वाचवल, जैश-ए-मोहम्मदच्या पोस्टर्सपासून ते दिल्ली बॉम्बस्फोटांपर्यंत... संपूर्ण टाइमलाइन वाचा...

Google Doodle Celebrating Quadratic Equation: गूगलला गणिताची भूरळ, मॅथ्स फॉर्म्युला वापरून बनवलं डूडल, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT