मुंबई

नवी मुंबईत कचऱ्याचे ढिगारे

CD

नवी मुंबईत कचऱ्याचे ढिगारे
रोगराई पसरण्याची भीती; उपाययोजना करण्याची मागणी
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) ः स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराची कचरामुक्त आणि स्वच्छतेसाठी आदर्श शहर म्हणून ओळख असली तरी आजही शहरातील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. महापालिकेने स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत, मात्र रस्त्यांवरील दुर्गंधी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मनस्‍ताप होत आहे.
महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर बनवण्याचे उद्दिष्ट ठरवले असून, शहरातील सर्व कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहेत. यामुळे कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवर नागरिकांनी कचरा थेट टाकणे, माणुसकीच्या भिंतींवरील कपडे किंवा खराब धान्याचा कचरा पसरवणे, मद्याच्या बाटल्या आणि जेवणाची पाकिटे ओव्हरफ्लो करणे या प्रकारांमुळे रस्त्यावर कचऱ्याची परिस्थिती बिकट झाली आहे. तुर्भे सेक्टर २० येथील सीडब्ल्यूसी वेअर हाऊसजवळ दुभाजकाच्या मधोमध रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच तुर्भे स्टोअर, पावणे नाका, सानपाडा सेक्टर ५, माणुसकीची भिंत, सानपाडा सेक्टर ४ स्टेशन रोड, कोपरखैरणे सेक्टर १९ इत्यादी ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांना जाता-येता दुर्गंधीचा सामना करावा लागतो. स्वच्छतेसाठी महापालिकेने जनजागृतीसह कडक कारवाई करणे गरजेचे आहे. लिटिल बीन्ससारख्या उपक्रमांच्या माध्यमातून फक्त रस्त्यावर कचरा टाकू नये, असा संदेश दिला जातो. परंतु नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, असे सांगण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ता नीलेश कचरे म्हणाले, की स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईने ओळख निर्माण केली आहे, तरीही अनेक भागांत कचऱ्याचे ढीग दिसतात. काही ठिकाणी कचरा उचलला जातो, मात्र काही ठिकाणी तक्रारी करूनही तो कायम राहतो.
.....................
नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांनी सांगितले, की संबंधित विभागास तक्रार कळविण्यात आली असून, दोन दिवसांच्या आत सर्व कचरा उचलला जाईल. नागरिकांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अजय गडदे, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीवूड-बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा! लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार; नवं वेळापत्रक कधी लागू होणार?

IND vs PAK: Impact Player मेडल जिंकताच तिलक वर्मा पडला पाया; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

Karad News : पडत्या काळात कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसला भरभक्कम करण्याचे नामदेव पाटील यांच्यासमोर आव्हान

Pune Crime : पत्नीच्या वेगळे राहण्याच्या मागणीला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT