मुंबई

पनवेल नवरात्रोत्सवात होणार मतपेढीचे ब्रँडिंग

CD

नवरात्रोत्सवात होणार मतपेढीचे ब्रँडिंग
आरत्यांपासून महाप्रसादापर्यंत उमेदवारांची उपस्थिती
पनवेल ता. २२ (बातमीदार) ः पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात उमेदवारांकडून राजकीय ब्रँडिंगला जोर आला आहे. आरत्या, भजन, पालखी, मिरवणुका, महाप्रसादापासून देवीच्या मांडवांपर्यंत उमेदवारांचे दर्शन होणार असून, मतदारांवर छाप पाडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवरात्रोत्सव राजकीय रंगाने नटणार आहे. काही उमेदवारांनी आधीच देवीच्या मंडपांत आपले बॅनर व पोस्टर्स लावले असून, समाजमाध्यमांवरही याची जोरदार प्रसिद्धी सुरू आहे. उत्सव काळात उमेदवारांच्या भेटीगाठी, आरतीला उपस्थिती, पालखी मिरवणुकीत सहभाग यामुळे मतदारांशी जवळीक साधली जाणार आहे. या निमित्ताने शहरातील सर्व मांडवांमध्ये नेत्यांची फेरी होणार आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हळदी-कुंकू, भोंडला समारंभांचे आयोजन, युवकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि वरिष्ठ नागरिकांसाठी भजन संध्यांचे प्रायोजकत्व घेतले जात आहे. पनवेलमधील प्रमुख नवरात्र मंडळांनीही राजकीय नेत्यांना आमंत्रणे दिली असून, काही मंडळे उमेदवारांकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे यंदाचा उत्सव हा फक्त धार्मिक न राहता निवडणुकीच्या वातावरणाने रंगणार आहे.

प्रतिनिधींची यंत्रणा...
उत्सव काळात झालेल्या बांधणीला मोठ्या नेत्यांसह त्यांच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील नेते कार्यरत झाले आहेत. पालिकेत गट शाबूत ठेवणारे इच्छुकही त्यात सक्रिय आहेत. आरतीपासून महाप्रसादापर्यंत इव्हेंट कॅश करण्यास राजकीय नेत्यांची चढाओढ दिसते. त्यामुळे उत्सव काळात नवा ट्रेंड शहरात येऊ लागला आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी लागलेली फील्डिंग निवडणुकांची नांदी ठरते आहे. चौका-चौकातील मंडळात प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

ही आपली पोरं आहेत; नेत्यांचा सूर
पालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर माजी नगरसवेकही सक्रिय झाले आहेत. कार्यकर्ते, मंडळाच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या समस्या मांडण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. बैठकीत समजावून सांगणाऱ्या नेत्यांचा सूर सध्या मंडळांची बाजू मांडताना दिसत आहे. प्रशासनाचे बंधन असतानाही आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे दाखवण्याचे अनेक जण काम करत आहेत.

विनापरवाना बॅनर महसूल बुडतोय
या काळात मोठ्या प्रमाणावर राजकीय बॅनर, कमानी, फ्लेक्स आणि पोस्टर्स उभारले जात आहेत. त्यासाठी पालिकेकडून परवानगी घेतली जात नाही. या अनधिकृत जाहिरातींमुळे पालिकेचा मोठा महसूल बुडतो आहे. प्रशासनाकडून कारवाईची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. यामुळे विनापरवाना बॅनरबाजीला आणखी खतपाणी मिळत आहे.

Dhirendra Shastri : गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडा, कारण...धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! आता बॅंकेत त्याच दिवशी क्लिअर होणार धनादेश (चेक); ‘आरबीआय’चे सर्व बॅंकांना परिपत्रक; खात्यात पैसे ठेवूनच द्यावा लागणार त्या तारखेचा चेक

Gadchiroli News : १०६ शरणागत माओवाद्यांनी गिरवले शिक्षणाचे धडे

Ladki Bahin Yojana : सरकारच्या लाडकी बहिण योजनेत चार हजार ९०० कोटींचा भष्ट्राचार; खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघाती आरोप

Pune Encroachment : आंदेकरच्या प्रभावक्षेत्रात अतिक्रमण कारवाई; माहिती देण्यास महापालिका अधिकाऱ्यांची टाळाटाळ

SCROLL FOR NEXT