पनवेलकरांची रक्षण करणारी जाखमाता देवी
पनवेल, ता. २२ (बातमीदार) ः पनवेलकरांचे रक्षण करणारी आणि संकटांपासून गावाचे संरक्षण करणारी जागृत माता म्हणून पनवेलमधील जाखमाता देवीचे स्थान भक्तांच्या हृदयात अढळ आहे. प्लेगच्या साथीच्या काळापासून ते आजच्या २१व्या शतकातही भक्तांची ही श्रद्धा अबाधित आहे. चैत्रातील पालखी सोहळा आणि अश्विनातील नवरात्रोत्सव या प्रमुख सणांमध्ये जाखमाता देवी मंदिर परिसर भक्तिभावाने उजळून निघतो.
पनवेलचे ग्रामदैवत म्हणून जाखमाता देवीचे महत्त्व आहे. १९४२ ते १९४५ दरम्यान पनवेल गावात प्लेगची भीषण साथ पसरली असताना अनेकांनी गाव सोडले, मात्र जाखमाता देवीच्या कृपाछत्राखाली राहणाऱ्या भक्तांवर कोणताही परिणाम झाला नाही. या घटनेनंतर देवीचे माहात्म्य पनवेलसह आसपासच्या गावांमध्ये पसरले आणि जाखमाता देवी ग्रामस्थांच्या हृदयात जागृत देवस्थान म्हणून प्रतिष्ठित झाली. देवीची पालखी प्रथम याच घटनेनंतर चैत्र महिन्यात काढली गेली आणि आजही हा सोहळा नऊ-दहा दशकांपासून कायम आहे. पनवेल शहरातून पालखी रात्री नऊ वाजता निघते आणि पहाटेपर्यंत मंदिरात आणली जाते. मात्र अलीकडच्या काळात कायद्याच्या बंधनामुळे पालखी वेळेच्या चौकटीत फिरवली जाते. नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. देवीला साडीचोळी नेसवणे, ओटी भरणे, पाळण्याचा नवस बोलणे किंवा जन्मलेल्या बालकाचे व्यंग दूर होण्यासाठी चांदी, तांबे किंवा लाकडी अवयवांच्या प्रतिकृती अर्पण केल्या जातात. गावात जन्मलेल्या बाळाला प्रथम देवीच्या पायाशी ठेवण्याची प्रथा आणि नवविवाहित दांपत्याचे प्रथम दर्शन घेणे आजही जपले जाते.
..................
देवीच्या पुरातन आख्यायिकेनुसार, देवीचे वाहन वाघ होते आणि देवी वाघावर बसून गावाचे रक्षण करीत असे. मंदिरात नित्यनेमाने येणारा वाघ एकदा नानासाहेब पुराणिक यांच्या घरात शिरल्याने गावकरी घाबरले. त्या वेळी टी. पी. श्रृंगारपुरे यांनी गोळी झाडून वाघ ठार केल्याची आख्यायिका जाहीर आहे. आज मंदिराचा जीर्णोद्धार होऊन भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. चैत्रातील पालखी सोहळा आणि अश्विनातील नवरात्रोत्सव हे पनवेलकर अत्यंत भक्तिभावाने साजरे करतात. तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सामुदायिक आरती आयोजित केली जाते. नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळते आणि देवीच्या जयघोषाने पनवेल दुमदुमून जाते. हे दृश्य भक्तांसाठी एक अनमोल अनुभव ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.