मुंबई

आयुर्वेदाचे स्व-उपचार पडतील महागात

CD

आयुर्वेदाचे स्व-उपचार पडतील महागात
आयुर्वेददिन विशेष; उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : बदलत्या जीवनशैलीत बहुतेक जण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वतःहून उपाय शोधण्याकडे झुकतात. विशेषतः आयुर्वेदीय औषधे, घरगुती उपाय आणि वनस्पतिजन्य उपचारांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, पण ‘नैसर्गिक, वनस्पतिजन्य किंवा आयुर्वेदीय उपचार नेहमीच सुरक्षित आणि दुष्परिणाममुक्त’ हा समाजात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. कोविड काळात प्रत्येक घरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तयार केलेल्या काढ्यांचाही लोकांना दुष्परिणाम झाल्याचे वरळी पोदार रुग्णालय स्थित ‘केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद’ या केंद्रातील संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. दरवर्षी २३ सप्टेंबर या दिवशी आयुर्वेददिनी आयुर्वेद, त्याचा उपयोग आणि दुष्परिणाम याबाबतीत जनजागृती केली जाते.

हळद, आलं, मेथी, कारल्याचा रस, काढा, जिरं किंवा ओवा यांसारखी औषधी द्रव्ये योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने वापरली, तर नक्कीच आरोग्यास लाभ होतो; मात्र याच औषधींचा अतिरेक, चुकीच्या आजारात उपयोग, चुकीच्या प्रमाणात सेवन किंवा दीर्घकाळ अनियंत्रित वापर यामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. त्वचेवर खाज, पुरळ, लालसरपणा किंवा इतर त्रास निर्माण होण्याचीही शक्यता असते. सौंदर्यप्रसाधने किंवा औषधी मलमांचा विनाकारण वापर टाळावा, कारण त्यातूनही अपाय संभवतो, असेही आयुर्वेदतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. २०२५च्या आयुर्वेददिनाचे संकल्पना ‘आयुर्वेदा फॉर पीपल अँड आयुर्वेदा फॉर प्लॅनेट’ आहे. याचा अर्थ आयुर्वेद केवळ व्यक्तीचे आरोग्य जपणारा नाही, तर पृथ्वीच्या संतुलनाशीही निगडित आहे. स्थानिक वनस्पती, शाश्वत पद्धतीने तयार केलेले औषधोपचार आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या सर्व आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांमध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाचा अवलंब केल्याने आपण स्वतः निरोगी राहतो आणि पृथ्वीच्या आरोग्यासही हातभार लावतो. दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितले की, ‘आयुर्वेदाचे तत्त्व स्पष्ट सांगते, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे जे औषध एका व्यक्तीला हितकारक ठरेल, तेच दुसऱ्याला अपायकारक ठरू शकते. म्हणूनच कोणतेही आयुर्वेदीय औषध किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी प्रमाणित आयुर्वेदाचार्यांचा सल्ला अत्यावश्यक आहे.’


संशयित तक्रारींची नोंद
२०१८ पासून आतापर्यंत आयुष सुरक्षा पोर्टलवर १०६ संशयित रुग्णांची प्रकरणे नोंदली गेली असून, ३,०७९ दिशाभूल करणाऱ्या आयुष संदर्भातील जाहिरातींची नोंद करण्यात आली आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी व ॲलोपॅथीच्या औषधांचा एकत्रित वापर करणारे रुग्ण अनेकदा दुष्परिणामांच्या तक्रारींसह आढळतात. प्रत्येक औषधाची मात्रा, वेळ व आजाराच्या प्रकृतीनुसार वापर बदलतो. म्हणूनच स्वतःहून औषध घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

..
कोविड काळात अति आयुष काढा सेवनामुळे झालेल्या काही घटनांवरूनही हे स्पष्ट झाले आहे की, स्वउपचार घातक ठरू शकतो. जाहिरातींवर विश्वास ठेवून अंधाधुंद औषध सेवन केल्यास अपेक्षित परिणाम न मिळता शरीरावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो. ड्रग्ज अँड रेमिडी कायद्यानुसार, काही ठरावीक ५४ आजारांवरील औषधांच्या जाहिरात न करणे बंधनकारक आहे. तरीही काहीवेळा अशी जाहिरात झाल्यास लोक औषधे घेतात. तसेच, ॲलोपथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांचे उपचार एकत्रितपणे घेतल्यास धोका निर्माण होतो.
- डॉ. दत्तात्रय दिघे, अनुसंधान अधिकारी (आयु)

अनेक औषध कंपन्या आयुर्वेदाच्या नावाखाली अतिशयोक्तीपूर्ण दावे करून जनतेची दिशाभूल करतात. अशा जाहिरातींवर आयुष मंत्रालय बारकाईने नजर ठेवून आहे. अजूनही त्यामध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. शिवाय, शासकीय यंत्रणांनी अशा औषधांच्या विक्रीवर काटेकोर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, हे केंद्र केंद्रीय आयुर्वेदिय अनुसंधान संस्थान आयुष मंत्रालयाअंतर्गत पेरिफरल फार्माकोविगीलन्स सेंटर म्हणून मागील सात वर्षांपासून कार्यरत आहे.
- डॉ. आर गोविंद रेड्डी, प्रभारी सहाय्यक निदेशक (आयु)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri Aarti : नवरात्री स्पेशल श्री दुर्गा मातेच्या 5 खास आरत्या, खरे भक्त असाल तर नक्की वाचा

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिर आता आधुनिक आणि सुरक्षित होणार! नवीन सुविधा काय असणार? खर्चाचा आकडा वाचून व्हाल थक्क

Mumbai Local: सीवूड-बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा! लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार; नवं वेळापत्रक कधी लागू होणार?

IND vs PAK: Impact Player मेडल जिंकताच तिलक वर्मा पडला पाया; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

Karad News : पडत्या काळात कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसला भरभक्कम करण्याचे नामदेव पाटील यांच्यासमोर आव्हान

SCROLL FOR NEXT