मुंबई

नवीन पनवेलच्या जयश्री हाडवळे यांचे ‘जुन्नरकर होम किचन

CD

नवीन पनवेलच्या जयश्री हाडवळे यांचे ‘जुन्नरकर होम किचन’ – स्वादासोबत रोजगाराचाही मंत्र
वसंत जाधव / सकाळ वृत्तसेवा.
पनवेल, ता. २२ : चव, परंपरा आणि उद्यमशीलता यांचा सुंदर संगम घडवणारी जयश्री देवराम हाडवळे यांची ‘जुन्नरकर होम किचन’ ही नवीन पिढीतील यशस्वी स्टार्टअपची प्रेरणादायी कहाणी आहे. घरगुती मसाले व देशी तूप वापरून गेली चार वर्षे सातत्याने चालणारा हा व्यवसाय केवळ ग्राहकांच्या चवीची पूर्तता करत नाही, तर १० महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतो.

जुन्नरकर होम किचनचा सिग्नेचर पदार्थ म्हणजे पारंपरिक मासवडी. मुंबई महानगरपालिका, मंत्रालय, नवी मुंबई महापालिका, बेस्ट, सिडको, महावितरण तसेच अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये या पदार्थाला विशेष मागणी आहे. याशिवाय घरगुती दिवाळी फराळ, ड्रायफ्रूटचे पदार्थ, विविध प्रकारचे लाडू आणि आंबा हंगामात हापूस आंब्याचा शुद्ध व स्वादिष्ट रसही ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. जुन्नरकर होम किचन केवळ नियमित ऑर्डरपुरते मर्यादित न राहता वाढदिवस, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी खासगी समारंभांसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स स्वीकारते. यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी पारंपरिक, पौष्टिक व चविष्ट जेवणाचा पर्याय उपलब्ध होतो.

वार्षिक ताळेबंद लाखोंच्या घरात असलेल्या या व्यवसायामुळे जयश्री हाडवळे यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत १० महिलांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून या स्टार्टअपकडे पाहिले जाते. जयश्री हाडवळे यांचे ‘जुन्नरकर होम किचन’ हे फक्त एक व्यवसाय नाही, तर परंपरेची चव जपण्याचे व समाजात रोजगारनिर्मिती करण्याचे सुंदर साधन आहे.

उकडीच्या मोदकांना मागणी
घरगुती किचनमधून बनवलेले उकडीचे मोदक हा इथला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. विशेष म्हणजे हे मोदक फक्त गणेशोत्सवातच नव्हे तर बाराही महिने ग्राहक ऑर्डर देतात. देशी तूप व घरगुती मसाल्यांचा वापर करून हे सर्व पदार्थ तयार केल्याने ग्राहकांचा विश्वास वर्षानुवर्षे टिकून आहे. गणेशोत्सवात लाखोंची उलाढाल होते. पनवेलच्या मोदकाला मुंबईपर्यंत मागणी असते. साजूक तुपातील केसरयुक्त उकडीचे मोदक भारी आहेत. गणेशोत्सवात पनवेल शहरात उकडीच्या मोदकांचे शेकडो नग विक्री होत असून, लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गेल्या काही वर्षांत उकडीच्या तयार मोदकांच्या खरेदीकडे कल वाढला आहे. जुन्नरकर होम किचनमध्ये गणेशोत्सवातील १० ही दिवसांत दिवसाला दोन ते अडीच हजार मोदकांची ऑर्डर सुरूच असून, घरघुतीसह मंडळांकडून मोठी मागणी आहे. पनवेलमधून नेरूळ, वाशी, खारघर, कोपरखैरणे, घाटकोपर, चेंबूर, चुनाभट्टी मुंबईपर्यंत ऑर्डर जात आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात अनेकांना उकडीच्या मोदकांमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

स्वतःचा व्यवसाय सुरू करताना माझा एकच उद्देश होता. घरगुती चव ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि माझ्यासारख्या महिलांना रोजगार देणे. आज ‘जुन्नरकर होम किचन’मुळे १० महिलांच्या कुटुंबाला हातभार लागतो, हीच माझ्यासाठी खरी कमाई आहे.
जयश्री देवराम हाडवळे, जुन्नरकर होम किचन, नवीन पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिर आता आधुनिक आणि सुरक्षित होणार! नवीन सुविधा काय असणार? खर्चाचा आकडा वाचून व्हाल थक्क

Mumbai Local: सीवूड-बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा! लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार; नवं वेळापत्रक कधी लागू होणार?

IND vs PAK: Impact Player मेडल जिंकताच तिलक वर्मा पडला पाया; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

Karad News : पडत्या काळात कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसला भरभक्कम करण्याचे नामदेव पाटील यांच्यासमोर आव्हान

Pune Crime : पत्नीच्या वेगळे राहण्याच्या मागणीला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT