सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
सीसीटीव्हीसह पायाभूत सुविधांसाठी ७८ कोटी खर्च करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर आता आधुनिक आणि सुरक्षित होणार आहे. वाढत्या भक्तसंख्येचा विचार करून मंदिर परिसरातील सुविधा अधिक सुकर आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेकडून सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा उभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पावर तब्बल ७८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील दोन वर्षांत हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सिद्धिविनायक मंदिर परिसराचा कायापालट तीन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात भक्तांच्या सोयी-सुविधांबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. यात प्रवासी सुविधा, लिफ्ट व एस्केलेटरची उभारणी, बेसमेंट पार्किंगसह वायुवीजन प्रणाली, अन्नदान भवनामध्ये अत्याधुनिक सुविधा केंद्र आदी सोयी उपलब्ध केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फत करण्यात आले.
विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. नवीन बांधकाम, भिंती, खांब, कमानींवरील शिल्पकाम आणि इमारतींचे फसाड क्लॅडिंग या टप्प्यातील विशेष कामांमध्ये समाविष्ट असेल.
भाविकांसाठी सुखसोयी वाढणार
सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सण-उत्सवांच्या काळात तर गर्दी प्रचंड वाढते. याच कारणामुळे काही वर्षांपूर्वी मंदिराभोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली होती, मात्र वाढती भक्तसंख्या लक्षात घेता आता पार्किंग, आसन व्यवस्था, छत्र्यांसह हवामानापासून संरक्षण, पूजेचे साहित्य विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉल्स अशा सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर आधुनिक, सुरक्षित व अधिक आकर्षक स्वरूपात दिसणार असून, मुंबईसह देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
काय असणार सुविधा?
वीज व सुरक्षा व्यवस्था, आधुनिक विद्युत यंत्रणा व पॅनेल्स, इन्व्हर्टर व जनरेटरची सोय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, सार्वजनिक सूचना यंत्रणा, आगीसंदर्भात संदेश देणारा आवाज, तुषार सिंच नव इतर अग्निशमन यंत्रणा, पावसाचे व सांडपाणी निचरा व्यवस्था, स्वच्छतागृह व पाइपलाइन सुधारणा, पाण्याच्या टाक्यांची उभारणी, पायाभूत सुविधा, मंदिर परिसरात नवीन फरशी, छतावरील आच्छादन (ऊन-पावसापासून संरक्षणासाठी), दालन व प्रवेशमार्गाचे आधुनिकीकरण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.