मुंबई

पालघर जिल्ह्यात प्रारंभ

CD

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाला पालघरमध्ये सुरुवात
पालघर, ता. २३ (बातमीदार) ः देशभरात महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी केंद्र सरकारतर्फे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबवले जात असून, त्याची सुरुवात पालघर येथे ग्रामीण रुग्णालयातही झाली आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या अभियानाच्या निमित्ताने महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग, एचआयव्ही, क्षयरोग, सिकल सेल, दंत तपासणी आदी विविध चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अंगणवाडी स्तरावर पूरक आहार पाककृती प्रदर्शन, पोषण शपथ, स्थानिक आहाराचा प्रसार, ॲनिमिया जनजागृती, योग व मानसिक आरोग्य उपक्रम घेण्यात येणार आहेत. महिलांचे आरोग्य हेच सशक्त कुटुंब आणि मजबूत समाजाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन सवरा यांनी केले.
राजेंद्र गावित म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांना मोफत तपासण्या आणि पोषण सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असून, तो प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे, तर मनोज रानडे यांनी आरोग्य तपासण्या, प्रत्येक महिला आणि बालकाने आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र, अंगणवाडी किंवा आयुष्मान केंद्राशी संपर्क साधून या अभियानाचा फायदा नक्की घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, डॉ. उमेश दुम्पलवार, आशा ताई डॉ. दीप्ती गायकवाड आणि अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली स्फोटात ९ जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जखमी; मृत अन् जखमींची यादी आली समोर

Terror Attacks In India : भारत मातेवर दहशतवाद्यांनी ३२ वर्षांत तब्बल १४ वेळा हल्ला केला, देशातील स्फोटाच्या प्रमुख घटना अशा...

Pune Weather: पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद; थंडीचा पारा आणखी घसरून १३.२ अंश सेल्सिअसवर

Delhi Blast : दिल्लीत आत्मघातकी हल्ला? स्फोटकांनी भरलेली कार चालवत होता दहशतवादी उमर, CCTV फुटेज समोर

Gautam Gambhir : खेळाडूंच्या फिटनेसमध्ये सुधारणा आवश्‍यक, टी-२० विश्वचषकापूर्वी गौतम गंभीरचं मोठं विधान, नेमका रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT