मुंबई

समृद्धीचे पंख देऊन महिलांचा प्रेरणास्रोत

CD

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. २३ : या, शिका आणि समृद्धीचे पंख लावून उंच भरारी घ्या, या उद्देशाने महिलांच्या पंखांना बळ देण्याचे काम वसईतील किरण पाटील-बडे करत आहेत. २००७ मध्ये महिला बचत गटाची स्थापना करून खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरणाचा श्रीगणेशा त्यांनी केला. अनेक वर्षे हजारो महिलांना त्या विविध कलांचे प्रशिक्षण देऊन रोजगारही उपलब्ध करून देत आहेत.

मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात बालपण गेलेल्या किरण विवाहानंतर मुंबईत, त्यानंतर वसईमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झाल्या. विवाहापूर्वीपासूनच त्यांना समाजकार्याची ओढ होती. आपल्या घरात असलेल्या मोलकरणीच्या मुलीला त्यांनी शैक्षणिक आणि शिवणकामाचे धडे दिले. आज याच मुलीने यशस्वीतेची वाट धरली आहे. येथूनच बडे यांनी महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतला. महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर, तसेच आत्मसन्मानाने जगवण्यासाठी किरण यांनी आजवर महिलांसाठी अनेक योजना आखल्या असून, या योजनाअंतर्गत त्यांच्यासोबत जवळपास १५ हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. या महिलांना रोजगारक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले आहे. १३ महिलांना घेऊन त्यांनी समृद्धी महिला बचत गटाची स्थापना केली होती.

बचत गटातील प्रत्येक महिलेला किरण यांनी शिवणकलेचे उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन आत्मसन्मानाने जगण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी आपल्या फॅशन डिझायनिंगच्या कलाकौशल्याचा उपयोग करून या महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. महिलांनी शिवलेल्या लहान मुलांच्या वैविध्यपूर्ण कपड्यांना प्रतिसादही मिळाला. २०२१ मध्ये लायन्स क्लबच्या मदतीने बचत गटाच्या महिलांना घेऊन दुबईमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही त्या हिरिरीने सहभागी झाल्या. या महिलांना लोकल, तसेच ग्लोबल व्यासपीठ उपलब्ध करून देऊन एक वेगळाच आत्मविश्वास त्यांनी मिळवून दिला.

किरण यांचे सातत्यपूर्ण कार्य पाहून रकेम या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वातून महिलांना तीनचाकी प्रशिक्षणाबरोबरच भाड्याने गाड्याही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना दिली. त्यांनी ४० महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण दिले. या महिलांना त्वरित रिक्षा उपलब्ध करून देता यावी, यासाठी त्यांनी थेट टिव्हएस कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने त्यांना सहकार्य करीत अतिशय वाजवी दरात प्रशिक्षित महिलांसाठी ३० रिक्षा उपलब्ध करून दिल्या.

लॉकडाऊनच्या काळात रोजगार
लॉकडाऊनच्या काळात काम नसलेल्या साधारण ५० महिलांना फूड डिलिव्हरी चालू करून देऊन त्या आधार बनल्या. त्यासाठी त्यांनी सायकल आणि दुचाकी भाड्याने उपलब्ध केल्या. सध्या ‘मॉम रायडर’ या प्रकल्पाद्वारे किरण महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी दोनचाकीचे प्रशिक्षण, तसेच इलेक्ट्रिक गाड्याही मिळवून देत आहेत. या माध्यमातून ‘कोणतीही कंपनी जोडा आणि सक्षम व्हा’, या उद्देशाने हे प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

Donald Trump: रशियाला निधी पुरवला; युक्रेन युद्धासाठी भारत-चीन जबाबदार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आरोप

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT