मुंबई

शहापुरात दुष्काळी परिस्थिती

CD

शहापुरात दुष्काळी परिस्थिती
परतीच्या पावसात हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली

किन्हवली, ता. २३ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भातशेती संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून, शेतकऱ्यांच्या किमान तीन हजार हेक्टर क्षेत्रात भात, नागली, वरई अशा पिकांची लागवड झाली आहे. मात्र अतिपावसामुळे भातपिकाचा दाणा तयार होण्याच्या प्रक्रियेला धोका निर्माण झाला आहे. परिणामी शहापूर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

शहापूर तालुक्यात यंदा प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडत असून, अजूनही पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा भातशेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. ७ मेपासून पावसाला सुरुवात झाली असून, तो अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पावसाच्या हुलकावणीमुळे भातशेतीला आवश्यक असलेला पाऊस न मिळाल्याने निम्मी पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यंदा परिस्थिती उलट असून, निम्म्यापेक्षा अधिक भातपिके ही भाताच्या लोंब्याबाहेर पडूनही पाण्यात आहेत, तर काही दाणा तयार होऊन कडक उन्हाच्या प्रतीक्षेत आहेत. जर या भातपिकाला आवश्यक ऊन मिळाले नाही तर मात्र उरलीसुरली पिकेही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील वर्षी भातसा धरण क्षेत्रात २०१७ मिलिमीटर पाऊस पडला होता. यावर्षी हे प्रमाण तीन हजार ९६७ मिलिमीटर इतके आहे. ते येत्या काही दिवसांत वाढणार आहे. शहापूर परिसरात आजपर्यंत तीन हजार ४६० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षी ती दोन हजार १२ मिलिमीटर होती. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हळवे भातपीक धोक्यात
शहापूर तालुक्यातील सर्वच भागांत संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे हळवे भातपीक धोक्यात आले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास जातो की काय, या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे भातपिकाला आलेला फुलोरा खुडून पडत असल्याने भाताचा दाणाच तयार होणार नाही. परिणामी, भातपिकाचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाचा मुक्काम असाच वाढत राहिला तर भातपिकाची संपूर्ण नासाडी होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

बगळ्या-खोडकिडीचा प्रादुर्भाव
यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने भातपिकावर रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाणही वाढले आहे. भातपिकावर पडलेल्या खोडकिड्याने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर औषध फवारणीचा अधिकचा भार आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक दखल घेऊन संबंधित औषध तत्काळ मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, बगल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी युरिया खताची खरेदी केली; मात्र पाऊस विश्रांती घेत नसल्याने भातपिकावर खत मारणे शक्य झाले नाही. पर्यायाने घरात ठेवलेल्या खताचेच पाणी होण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

सध्याची बिकट परिस्थिती बघता सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि लागवड केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर ५० हजार रुपये सरसकट नुकसानभरपाई द्यावी.
-प्रा. डॉ. प्रकाश भांगरथ, शेतकरी नेते व कृषितज्ज्ञ, शहापूर

पावसाचे प्रमाण

मागील वर्षी पाऊस : २०१२ मिलिमीटर
यंदा पाऊस : ३४६० मिलिमीटर (सध्या)
यंदा पाऊस मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट

भातशेतीचे क्षेत्र

सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रात भात, नागली, वरईची लागवड
भातशेतीचे सुमारे ५०-६० टक्के क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.

पिकांच्या स्थितीचा आढावा

हळवे भातपीक धोक्यात (फुलोरा खुडून पडणे, दाणा तयार होण्यास अडचण)
भाताचे दाणे पाण्याखाली, त्यामुळे नासाडीचा धोका
काही भागांमध्ये भाताच्या दाण्यांवर कडक उन्हाच्या प्रतीक्षा

रोग व किडींचा प्रादुर्भाव

भातावर बगळ्या आणि खोडकिडींचा प्रादुर्भाव वाढला
रोगांमुळे भातशेतीस मोठे नुकसान
औषध फवारणीसाठी आर्थिक भार वाढला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Rain : कोलकातामध्ये पावसाने मोडला ३७ वर्षांचा विक्रम, रस्ते वाहतूक ठप्प; रेल्वे- विमाने रद्द, ८ जणांचा मृत्यू

Arshdeep Singh: एक ही सरदार, पाकिस्तानी गार! अर्शदीपने Haris Rauf च्या 'विमान' सेलिब्रेशनचं काय केलं ते पाहा... Viral Video

Diwali Gifts: सरकारी पैशांचा वापर करून दिवाळी भेटवस्तू देण्यावर बंदी, अर्थ मंत्रालयाकडून सर्व मंत्रालये आणि विभागांना आदेश

Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ८ जणांचा सामूहिक अत्याचार; नातेवाईकाने मित्रांना बोलावले अन्...

Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी २३ कक्षांची स्थापना

SCROLL FOR NEXT