मुंबई

मराठवाड्यातील पुरग्रस्तांना रोह्यातून मदत

CD

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना रोह्यातून मदत
सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्थेचे पथक दाखल
रोहा, ता. २३ (बातमीदार) ः मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा घातल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून अशा गावांमधील बचावकार्यात रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ सदस्यही सहभागी झाले आहेत.
मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील लहू गाव, धाराशिव भागात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले उभे पीक एकीकडे पावसाने मातीमोल केले आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसाने अनेक भागांत पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी एनडीआरएफ जवानांच्या खांद्याला खांदा लावून सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्वातील रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्थेतील तरुण झटत आहेत. या पथकाने धाराशिव, लहू गावात अडकलेल्या शेकडो तरुणांना जीवाची बाजी लावून मदतकार्य सुरू ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Rain : कोलकातामध्ये पावसाने मोडला ३७ वर्षांचा विक्रम, रस्ते वाहतूक ठप्प; रेल्वे- विमाने रद्द, ८ जणांचा मृत्यू

Arshdeep Singh: एक ही सरदार, पाकिस्तानी गार! अर्शदीपने Haris Rauf च्या 'विमान' सेलिब्रेशनचं काय केलं ते पाहा... Viral Video

Diwali Gifts: सरकारी पैशांचा वापर करून दिवाळी भेटवस्तू देण्यावर बंदी, अर्थ मंत्रालयाकडून सर्व मंत्रालये आणि विभागांना आदेश

Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ८ जणांचा सामूहिक अत्याचार; नातेवाईकाने मित्रांना बोलावले अन्...

Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी २३ कक्षांची स्थापना

SCROLL FOR NEXT