मुंबई

‘एआय’मुळे उद्योगविश्वात बदल

CD

‘एआय’मुळे उद्योगविश्वात बदल
‘सायनॉलॉजी’चा परिषदेत तज्ज्ञांचे मत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः आधुनिक डेटा व्यवस्थापन व स्टोरेज सोल्युशन्ससाठी नावाजलेली कंपनी ‘सायनॉलॉजी’ने मंगळवारी (ता. २३) मुंबईत ‘मीडिया कनेक्ट २०२५’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. याआधी सोमवारी (ता. २२) झालेल्या ‘सायनॉलॉजी सोल्युशन डे इंडिया २०२५’नंतर हा खास मीडिया गेट-टुगेदर हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे पार पडला. या वेळी ‘सायनॉलॉजी’चे नवे प्रादेशिक विक्रीप्रमुख आंत्वोन यांग यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी ‘एआय’च्या मदतीने डेटा व्यवस्थापन व सायबर सुरक्षेसह उद्योगविश्वात मोठा बदल घडणार असल्याचे अधोरेखित करत दक्षिण आशियातील सायनॉलॉजीच्या वाढीच्या धोरणात्मक योजना व भारतीय बाजारपेठेतील प्रचंड संधी यावर प्रकाश टाकला.


आंत्वोन यांग यांनी, भारतातील वेगाने वाढणाऱ्या डेटा व्यवस्थापन क्षेत्रातील मागणी, उद्योगांसमोरील आव्हाने, तसेच कंपनीच्या ‘एंटरप्राइज डेटा मॅनेजमेंट सर्व्हे’ अहवालातील निष्कर्ष मांडले. हायब्रिड क्लाऊड, उच्च क्षमतेची स्टोरेज प्रणाली, एआयचा वापर, डेटा सुरक्षा आणि लवचिक व्यवस्थापन या मुद्यांवरही त्यांनी भर दिला. ‘सायनॉलॉजी’ने या कार्यक्रमात नवीन एंटरप्राइझ स्टोरेज मालिका (पीएएस व जीएस सीरिज), ॲक्टिव्ह प्रोटेक्ट डेटा, प्रोटेक्शन उपकरणे, एआय-आधारित उत्पादकता साधने आणि नेक्स्ट-जेन सर्व्हेलन्स सोल्यूशन्स सादर केली. यामुळे उद्योगांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि खर्च-प्रभावी प्रणाली उपलब्ध होणार असल्याचे यांग यांनी सांगितले. या कार्यक्रमातील विविध सत्रांत कीनोट स्पीच, प्रॉडक्ट डेमो, प्रश्नोत्तर सत्र, बूथ टूर व नेटवर्किंग यांचा समावेश होता.


सर्व उत्पादनांमध्ये ‘एआय’चा समावेश
कंपनीने आपल्या भविष्यातील उपक्रमाची घोषणा करताना स्पष्ट केले, की ‘सायनॉलॉजी’ आपल्या सर्व उत्पादनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान समाविष्ट करीत आहे. यामुळे कार्यक्षमता, लवचिकता व सुरक्षेचा स्तर अधिक वाढणार आहे. एआयच्या मदतीने डेटा व्यवस्थापन व सायबर सुरक्षेत मोठा बदल घडणार असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले. वाढते सायबर हल्ले, रॅन्समवेअर, डेटा प्रोटेक्शन यांसारख्या वाढत्या धोक्यांवरही भर दिला. आधुनिक युगात केवळ मिशन-क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे तर क्लाउड सर्व्हिसेस, एंडपॉइंट्स आणि सेकंडरी सिस्टम्स यांचे बॅकअप तितकेच महत्त्वाचे असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशनच्या नव्या टप्प्यात, एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणाऱ्या संस्था मोठा स्पर्धात्मक फायदा मिळवतील, असा विश्वास ‘सायनॉलॉजी’ने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

Poisioning : झारगडवाडीत भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याचा संशय; ४ महिलांवर उपचार सुरू

Mohol News : नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, बाधित झालेल्या सर्व घटकांच्या नोंदी घ्या; योगेश कदम यांनी दिल्या सूचना

Dickie Bird: क्रिकेटविश्वात शोककळा ! भारताच्या १९८३ वर्ल्ड कप विजयाचे साक्षीदार राहिलेल्या दिग्गजाचे निधन

SCROLL FOR NEXT