मुंबई

शिंदे गटाचे प्रचाराचे बिगूल

CD

शिंदे गटाचे प्रचाराचे बिगुल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत येणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ ः महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षसंघटन, उमेदवार चाचपणीच्या उद्देशाने शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने शनिवारी (ता. २७) कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत येणार असून मेळाव्यानंतर निवडणुकीसाठीचे बिगुल शिंदे गटाकडून फुंकले जाणार असल्याची शक्यता आहे.
नवी मुंबईत भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून शिंदे गटाच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ले सुरू आहेत. त्यामुळे नवी मुंबईत महायुतीमध्ये दरी वाढली आहे. दोन पक्षांमधील हा तणाव वाढत असल्याने शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाने शनिवारी वाशीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेताना प्रचाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. वाशीतील कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटातर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्याकरिता शाखाप्रमुखापासून ते जिल्हाप्रमुखांपर्यंत गर्दी आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला पदाधिकाऱ्यांवर महिला कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. संभाव्य उमेदवारांना शिंदेंसमोर चमकण्याची ही मोठी संधी असल्याने इच्छुकांमध्ये चढाओढ आहे. या मेळाव्यातून नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरणार असल्याने विरोधकांसाठी ही सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
----------------------------------------------
पक्षप्रवेशातून कोणाला धक्का?
लोकसभा निवडणुकीदरम्यान नवी मुंबईतील मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाशीतील सभेत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे येत्या शनिवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या उपस्थितीत कोणाचा पक्षप्रवेश होणार आहे, याची उत्सुकता लागली आहे. तसेच काही माजी नगरसेवक आणि महत्त्वाचे पदाधिकारी पक्षप्रवेश करणार असल्याने कोणाला धक्का बसणार, याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
-----------------------------
युवासेनेचे शक्तिप्रदर्शन
नवी मुंबईत शिंदे गटाच्या युवा सेनेचे नेतृत्व युवा जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्यावर आहे. म्हात्रे यांनी ३५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जम्बो कार्यकारिणी नियुक्त केली आहे. या मेळाव्यातून युवा सेना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
---------------------------------------------
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यानंतर नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या कामाला शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी लागणार आहेत. मेळाव्यानंतर शिंदे स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
- किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख, बेलापूर, नवी मुंबई
-----------------------------------------------
मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. प्रभागातील समस्या जाणून घेणार आहेत. स्थानिक प्रश्नांचे काम कुठपर्यंत आले आहे, दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करणार आहे.
- द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख, ऐरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

Delhi Blast : दिल्लीत २९ वर्षांत किती वेळा झाले स्फोट? संपूर्ण माहिती वाचा एका ठिकाणी

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : गृहमंत्री अमित शहा यांनी आयबी प्रमुखांकडून घेतली माहिती

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

SCROLL FOR NEXT