‘एमएसआरडीसी’चा सौर प्रकल्प कार्यन्वित
समृद्धी महामार्गालगत पाच मेगावॉटचा प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यभरात महामार्गांचे जाळे उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेले दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सुमारे पाच मेगावाॅट क्षमतेच्या दोन्ही सौर प्रकल्पात तयार होणारी वीज सुमारे ३.०५ रुपये प्रतियुनिट दराने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणला पुरवली जाणर आहे. दरम्यान, ‘एमएसआरडीसी’ने एकूण सुमारे २०४ मेगावाॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला असून, त्यावर काम सुरू असल्याने भविष्यात वीजविक्रीच्या माध्यमातून मोठा महसूल मिळू शकणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने वाशिम येथील कारंजालाड व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे उभारलेले सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा सौरऊर्जा प्रकल्प असलेला देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. समृद्धी महामार्गाच्या आखणीपासूनच वेगवान प्रवासाबरोबर सौरऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट महामंडळाने आखले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाशिम येथील कारंजालाड व बुलढाण्यातील मेहकर येथे नऊ मेगावाॅट स्थापित क्षमता असलेले सौर प्रकल्प आहेत. त्यापैकी कारंजालाड येथील तीन मेगावॉट व मेहकर येथील प्रकल्पातून दोन मेगावॉट वीजनिर्मितीस सोमवारी (ता. २२) सुरुवात झाल्याचे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदाल यांनी सांगितले.
सव्वादोन कोटी रुपयांचे उत्पन्न
एमएसआरडीसीला सध्या टोलनाक्यांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत आहे, मात्र आता कार्यान्वित करण्यात आलेल्या पाच मेगावाॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून वर्षाला सुमारे ७०-७५ लाख युनिट विजेची निर्मिती होऊ शकणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट विजेला ३.०५ रुपये एवढा दर मिळणार असल्याने एमएसआरडीसीला वर्षाला तब्बल दोन ते सव्वादोन कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.