मुंबई

ठाण्यात फळांची आवक वाढली

CD

ठाण्यात फळांची आवक वाढली
फळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

ठाणे, ता. २४ ( बातमीदार) : नवरात्रीपूर्वी बाजारपेठेत फळांची आवक वाढली असून, त्यामुळे फळांच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. यामुळे महिलांच्या उपवासासाठी आवश्यक फळे स्वस्त भावात आणि सहज उपलब्ध होत आहेत. गणेशोत्सवापासून फळांची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक असल्याने ग्राहकांची खरेदीही वाढली आहे. नवरात्रीच्या काळात महिलांचा उपवास आणि देवीची पूजा-आराधना मोठ्या श्रद्धेने केली जाते. या काळात फळे, दूध आणि जलाचे सेवन करण्याचा प्रथा असून, त्यासाठी आवश्यक साहित्य ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत उपलब्ध आहे.

“उदे ग अंबे उदे...” या जयकारासह नवरात्रीच्या पवित्र काळात अनेक महिला उपवास करीत देवीची मनोभावे पूजा व सेवा करत असतात. या उपवासात महिलावर्ग नऊ दिवस फळे, दूध आणि जलाचे सेवन करून देवीच्या आराधनेत मन लावून सेवा करत असतात. दरम्यान, नवरात्री सुरू होण्यापूर्वीच ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत फळांची आवक वाढल्याने फळांचे भाव काहीसे स्थिर झाले आहेत. यामुळे फळांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ दिसत असून, महिलावर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

नवरात्रोत्सव महिलांमध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक भावना वाढवण्यास मोठा हातभार लावतो. या काळात उपवास करणे आणि देवीची सेवा करणे हा धार्मिक कर्तव्यांशिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. या उपवासाला लागणारे विविध प्रकारचे साहित्य ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, या उपवासाला महिला वर्ग फळांचे सेवन करत देवीची उपासना करतात, मात्र गणेशोत्सवापासूनच फळांची आवक मोठ्या प्रमाणावर बाजारात होत असल्याने फळांचे भाव स्थिर झाले आहेत. यामुळे इतर भाविक आणि महिलांनाही मोठा दिलासा मिळाला असून, फळे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

स्वस्त भावात उपलब्ध
गणेशोत्सवापासूनच ठाणे बाजारपेठेत फळांची आवक वाढली असल्याने फळांचे भाव स्थिर झाले आहेत. त्यामुळे महिलांना उपवासासाठी फळे सहजपणे व स्वस्त भावात मिळत आहेत. भाव स्थिर झाल्यामुळे ग्राहकांची खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली असून, नागरिकांसह फळविक्रेत्यांनादेखील मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत फळविक्रेते धीरज गुप्ता यांनी सांगितले.

सध्या फळांचे भाव (प्रतिकिलो/डझन)
सफरचंद : २०० ते ३०० रुपये
पेर : २५० ते ३०० रुपये
डाळिंब : २०० ते २५० रुपये
केळी : ६० ते ८० रुपये डझन
मोसंबी : १२० ते १६० रुपये
संत्री : १६० रुपये
नारळ : ७० ते ८० रुपये (एक नग)
सिताफळ : २०० ते २५० रुपये
अननस : १५० रुपये
पपई : ७० रुपये
किवी : १२० रुपये (तीन नग पॅकेट)
ड्रॅगन फ्रूट: ६० ते ७० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: सिडकोचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! दररचनेत बदल करण्याचे निर्देश, राज्य सरकारचं मोठं पाऊल

Year End : गुगलवर सर्च झालेल्या सगळ्यांत वाईट गोष्टी कोणत्या? 2025 वर्षातील धक्कादायक रिपोर्ट लिक

Latest Marathi News Live Update : आंबेशिव गावात पुन्हा बिबट्याचा उच्छाद—स्थानीकांमध्ये भीतीचं वातावरण

Vidhan Bhavan ruckus case : विधानभवनात आव्हाड अन् पडळकर समर्थकांच्या राडा प्रकरणी अहवाल सादर

Railway Food: एअरलाईन्ससारखे ताजे अन्न आता ट्रेनमध्ये मिळणार! आयआरसीटीसीकडून मोठी सुधारणा; पण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT