मुंबई

कॉलम

CD

साक्षरता अभियानअंतर्गत चाचणी उत्साहात
जव्हार, ता. २५ (बातमीदार) ः केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता अभियानांतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जव्हार तालुक्यातील २२९ परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता. २१) अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. २,३६९ परीक्षार्थ्यांनी या चाचणीत सहभाग घेतला असून, यामध्ये १,३३६ महिला आणि १,०३३ पुरुषांचा समावेश होता. दरम्यान, तालुक्यातील २७० शाळांमध्ये ‘उल्हास’ अ‍ॅपद्वारे २,३१५ निरक्षरांची नोंदणी झाली होती. मागील परीक्षेत अनुपस्थित किंवा सुधारणा आवश्यक असलेल्या परीक्षार्थ्यांसह, या टप्प्यात एकूण सहभाग वाढला. चाचणीला येणाऱ्या निरक्षरांचे फुलांनी, पुष्पगुच्छांनी आणि पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. गावोगावी ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, शिक्षणालाही सणासारखे स्वरूप प्राप्त करून दिले.
चाचणीदरम्यान शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे यांनी खरंबा व दाभोसा शाळा परीक्षा केंद्रांना अचानक भेट देत उत्तम व्यवस्थापन आणि १००% उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनीदेखील विविध केंद्रांना भेट देऊन परीक्षार्थींशी संवाद साधला व त्यांचे मनोबल वाढवले.
या परीक्षेसाठी पाच बीट विस्तार अधिकारी, १९ केंद्र समन्वयक, बीएआरसी कर्मचारी आणि स्थानिक शिक्षक वृंद, स्वयंसेवक यांनी सक्रिय सहभाग घेतला. तालुकास्तरावर परीक्षा नियंत्रण व समन्वय पथक कार्यरत होते, ज्यामुळे परीक्षा अत्यंत सुरळीत पार पडली. ही परीक्षा केवळ शैक्षणिक प्रक्रिया न राहता, साक्षरतेचा एक उत्सव ठरली. शिक्षणाच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल घडवणारा हा उपक्रम समाजपरिवर्तनाची नांदी ठरतोय.
---
डहाणूत २,९४४ नवसाक्षरांनी दिली परीक्षा
डहाणू, ता. २५ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील दोन हजार ९४४ प्रौढ नवसाक्षरांनी, पायाभूत साक्षरता, वाचन, लेखन, संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा उत्साहात दिली. केंद्र सरकारमार्फत, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी (ता. २१) डहाणूतील २६ केंद्रांवर उत्साहात पार पडली. या वेळी जिल्हाअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेट दिली. राज्य शिक्षण संचालनालय योजना पुणेतर्फे, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत, ४५४ शाळांमधील २६ केंद्रांवर दोन हजार ९४४ प्रौढ नवसाक्षरांनी परीक्षा दिली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी यात सात विस्तार अधिकारी, २८४ स्वयंसेवक आणि ९७५ शिक्षकांचे सहकार्य लाभले, असे गटशिक्षणाधिकारी संजय वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT